

Encroachments Choke Ravet Junctions
Sakal
रावेत : रावेत परिसरातील मुख्य चौकांमध्ये रावेत चौक, पंपिंग स्टेशन आणि भोंडवे चौक येथे अतिक्रमणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना फेरीवाले, बेकायदेशीर पार्किंग आणि अर्धवट उभारलेले बांधकाम यामुळे वाहतुकीचा खोळंबा तर होत आहेच. पण त्याबरोबर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावरही गंभीर परिणाम होत आहे.