Pimpri Chinchwad Water Cut : रावेतमध्ये नदीतून बेकायदा पाणीउपसा पाणीचोरीवर कारवाईचा बडगा; अनधिकृत यंत्रणा हटविण्याचे आदेश

Illegal Water Extraction : पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये पाणीकपात असताना रावेत परिसरात पवना नदीतून बेकायदा पाणी उपसा करून टँकरद्वारे विक्री होत असल्याचे उघड झाले. जलसंपदा विभागाने कारवाईचे आदेश दिले.
water shortage in pimpri chinchwad

water shortage in pimpri chinchwad

sakal

Updated on: 

पिंपरी-चिंचवड : राज्यात दुष्काळी परिस्थिती आणि पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये पाणीकपात लागू असतानाही पवना नदीपात्रातून सर्रास पाणीचोरी सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नदीतून पाणी उपसून विहिरीत साठवायचे आणि टँकरद्वारे त्याची विक्री करायची, असा प्रकार रावेत परिसरात आढळला. संबंधितांवर कारवाई करून पाणीउपशाची यंत्रणा हटविण्याच्या सूचना जलसंपदा विभागाने दिल्या आहेत.

नदीपात्रातील सर्व बेकायदा उपसे चार दिवसांत बंद करण्याचा इशारा दिला आहे. अन्यथा संबंधित बांधकाम व्यावसायिकांवर आणि टँकरचालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन केले जात आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये पाणीकपातीचे निर्बंध लागू असून, नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, दुसरीकडे पवना नदीपात्रातून पाणी उपसून त्याची व्यावसायिक विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने रावेत परिसरात पाहणी केली. या वेळी एका शेतात नदीपात्रातून जलवाहिनी टाकून पाणी उपसले जात असल्याचे आढळले. ही जलवाहिनी विहिरीलाजोडली होती.

नदीतून उपसलेले पाणी विहिरीत साठवून त्यातून टँकर भरले जात होते. या टँकरद्वारे पाण्याची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. पथकाने संबंधित ठिकाणी कारवाई करून पाणीउपशाची यंत्रणा हटविण्याच्या सूचना दिल्या. तसेच, टँकर भरण्यासाठी उभारलेली यंत्रणाही काढून घेण्यास सांगितले. या कारवाईत उपअभियंता माणिक शिंदे, शाखाधिकारी अनिकेत पाटील यांच्यासह विभागाचे अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...