esakal | ‘हे माझं चुकलं का?’ असं विचारणाऱ्या फलकाची भोसरीत चर्चा

बोलून बातमी शोधा

Ravi-Landage

महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षामधील कलह आता लपून राहिलेला नाही. विविध सभा, बैठकांमधून नगरसेवक नाराजी व्यक्त करीत असतात. मात्र, रवी लांडगे यांनी ‘हे माझं चुकलं का?’ असे फ्लेक्स भोसरी परिसरात ठिकठिकाणी लावून पक्षांतर्गत कलह उघड केला आहे.

‘हे माझं चुकलं का?’ असं विचारणाऱ्या फलकाची भोसरीत चर्चा
sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

भोसरी - महापालिकेत एकहाती सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षामधील कलह आता लपून राहिलेला नाही. विविध सभा, बैठकांमधून नगरसेवक नाराजी व्यक्त करीत असतात. मात्र, रवी लांडगे यांनी ‘हे माझं चुकलं का?’ असे फ्लेक्स भोसरी परिसरात ठिकठिकाणी लावून पक्षांतर्गत कलह उघड केला आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपद न मिळाल्याने ते गेल्या आठवड्यापासून नाराज आहेत. याबाबत त्यांनी उघडपणे भूमिका मांडली होती. आगामी निवडणुकीत ते पक्षांतर करणार का? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.

लांडगे यांचे कुटुंब चाळीस वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ आहे. पंचवार्षिक निवडणुकीत रवी लांडगे बिनविरोध निवडून आलेले सदस्य आहेत. गेल्या चार वर्षात त्यांना एकही पद मिळालेले नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय झाला, अशी त्यांची भावना आहे. यातूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांनी भेट घेतली होती. निदान शेवटच्या वर्षात तरी पद मिळेल, अशी अपेक्षा त्यांना होती. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी ते इच्छुक होते. पद देण्याचे आश्वासन शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांनी आपल्याला दिले होते, असाही त्यांचा दावा होता. मात्र, ऐनवेळी नितीन लांडगे यांचे नाव जाहीर होऊन निवड झाली. यातूनच निर्माण झालेल्या नाराजीतून भोसरी परिसरात फ्लेक्स लागल्याची चर्चा आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

‘हे माझं चुकलं का?’ असे वाक्य ठळक अक्षरात फ्लेक्सवर आहे. त्याला जोडून विविध मजकूर असूनच लिहिला आहे. ‘सोयीचं राजकारण नाही, तर स्वाभिमानी राजकारण अंगीकृत केलं- ‘हे माझ चुकलं का?’  गोरगरिबांसाठी बांधलेल्या रुग्णालयाच्या खासगीकरणाला मी विरोध केला- ‘हे माझ चुकलं का?’ असे विचारले आहेत. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह उघड झाला आहे.

माझ्यासोबत लग्न केले नाही तर मी जीव देईल; धमकी दिल्याप्रकरणी तरुणाला अटक

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादी विरोधात बंड पुकारत माजी आमदार विलास लांडे यांच्या विरोधात ‘विकासाचे गाजर’ अशी फ्लेक्सबाजी केली होती. त्यावेळी याची चांगलीच चर्चा शहरात रंगली होती. आता रवी यांनी ‘हे माझं चुकलं का?’ अशी फ्लेक्सबाजी करीत महेश लांडगे यांच्याविरोधात बंड पुकारले आहे. विलास लांडे पुन्हा राजकारणात सक्रिय झालेले दिसून येतात. त्यामुळे शहराध्यक्ष म्हणून हा अंतर्गत कलह संपवण्याचे मोठे आव्हान लांडगे यांच्यापुढे आहे.

पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौरपदासाठी भाजप, राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल

माझ्या वडिलांनी शहरात भारतीय जनता पक्षाचा पाया रोवला. माझ्या चुलत्यांनी पक्षाचा विस्तार केला. मीही पक्षनिष्ठ राहिलो. शब्द पाळला गेला नाही. त्यामुळे माझ्यावर अन्याय झाला आहे. तरीही भाजपचेच काम करीत राहणार आहे. पक्ष बदलण्याचा विचार नाही.
- रवी लांडगे, नगरसेवक, भाजप

Edited By - Prashant Patil