- अमोल शित्रेपिंपरी - महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत तिकीटवाटपाचा निर्णय प्रमुख पक्षांसाठी डोकेदुखी ठरला आहे. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून अनेक इच्छुकांची तिकिटे कापली गेल्याने त्यांनी बंडाचा पवित्रा घेतला आहे..त्यातील काहींनी प्रतिस्पर्धी पक्षाची उमेदवारी घेऊन तर काहींनी अपक्ष भूमिका घेतली आहे. यामुळे काही प्रभागात प्रमुख पक्षांच्या उमेदवारांचे गणित बिघडण्याची शक्यता असून भाजप, राष्ट्रवादी व शिवसेना यांची डोकेदुखी वाढली आहे.पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीत ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी तब्बल ६९२ उमेदवार मैदानात आहेत. भाजपसह प्रमुख पक्षांसमोर उमेदवारी वाटपातून निर्माण झालेली अंतर्गत नाराजी मोठे राजकीय आव्हान ठरत आहे. भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी शेकडो इच्छुक रिंगणात होते..मात्र, सर्वांची मनधरणी करण्यास पक्षाला अपयश आले. अनेक प्रभागांत माजी नगरसेवकांना डावलून नवख्यांना उमेदवारी दिल्याने पक्षांतर्गत असंतोष खदखदत आहे. निवडणुकीच्या ऐनवेळी अनेकांनी पक्ष बदलून आव्हान उभे केले आहे. प्रमुख पक्षांचे तिकीट न मिळालेले काही माजींसह नवख्यांनीही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.पक्षांच्या उमेदवारांना टक्कर देण्याची व्यूहरचना त्यांनी आखली आहे. त्यामुळे बहुतांश प्रभागांमध्ये तिहेरी, चौरंगी, पंचरंगी, बहुरंगी लढतींचे चित्र आहे. याचा फटका कोणाला बसणार? हे निकालाच्या दिवशी अर्थात १६ जानेवारी रोजी स्पष्ट होणार आहे..राष्ट्रवादीला आव्हानप्रभाग १६नागरिकांचा मागास प्रवर्ग ब मधून राष्ट्रवादी काँग्रेसने माजी नगरसेविका प्रज्ञा खानोलकर यांना डावलून माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या पत्नी जयश्री भोंडवे यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज झालेल्या खानोलकर यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केले आहे..भाजपला आव्हानप्रभाग १८ ब (सर्वसाधारण) मधून भाजपने माजी नगरसेवक राजेंद्र गावडे यांना डावलून ॲड. मोरेश्वर शेडगे यांना उमेदवारी दिली. यामुळे नाराज गावडे यांनी सर्वसाधारण ड जागेसाठी अपक्ष उमेदवारी घेत बंडखोरी केली आहे. या जागेवर भाजपचे माजी नगरसेवक सुरेश भोईर निवडणूक लढवत आहेत..नवीन संधी, जुन्याची बंडखोरीप्रभाग १९ क मध्ये भाजपने माजी नगरसेवक शैलेंद्र मोरे यांच्या पत्नीला डावलून नवीन उमेदवार मधुरा नेताजी शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यामुळे नाराज मोरे यांनी बंडखोरी करत सर्वसाधारण क महिला जागेसाठी पत्नी कविता मोरे यांना अपक्ष मैदानात उतरवले आहे.आरक्षणानंतर समीकरणे बदललीप्रभाग २४ ड (सर्वसाधारण) मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट नाकारल्याने शिवसेनेचे माजी नगरसेवक ॲड. सचिन भोसले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे..इच्छुकांची बिघाडीप्रभाग २६ ड मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या आघाडीमुळे सर्वसाधारण पुरुष ही जागा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे लढवत आहेत. या जागेवर इच्छुक माजी नगरसेवक विलास नांदगुडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. यामुळे नांदगुडे यांनी बंडखोरीचा पवित्रा घेत मुलगा शंतनू नांदगुडे यांना अपक्ष उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे..माजी महापौरांपुढे आव्हानप्रभाग ३२ क (सर्वसाधारण महिला) मधील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्रशांत शितोळे भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांना सर्वसाधारण ड जागेसाठी उमेदवारी दिली आहे. माजी नगरसेविका शारदा सोनवणे यांना भाजपने उमेदवारी नाकारली आहे. परिणामी सोनवणे यांनी बंडखोरी करत सर्वसाधारण ‘क’ महिला जागेसाठी लढत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.