esakal | Pimpri chinchwad : आयटीआयमध्ये होणार सोमवारी भरती मेळावा
sakal

बोलून बातमी शोधा

ITI Students

आयटीआयमध्ये होणार सोमवारी भरती मेळावा

sakal_logo
By
आशा साळवी : सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : शिकाऊ उमेदवारी अधिनियम १९६९ अंतर्गत पिंपरी चिंचवड शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिकाऊ उमेदवारांचा भरती मेळावा सोमवारी (ता.४)आयोजित केला आहे. अशी माहिती अंशकालिन प्राचार्य एस. डी. साबळे यांनी दिली.

निगडी - यमुनानगरमधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात सकाळी साडेदहा वाजता मेळाव्यास सुरूवात होईल. आस्थापनांमध्ये शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण घेणे आवश्‍यक असते. त्याकरता या भरती मेळाव्याचे आयोजन डीजीटी नवी दिल्ली यांचे निर्देशानुसार करण्यात आले आहे. या भरती मेळाव्याकरता पिंपरी चिंचवड परिसरातील विविध आस्‍थापनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी कालावधीत आस्‍थापनांकडून प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन दिले जाते. तसेच प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर केंद्र शासनाकडून उत्तीर्ण उमेदवारांना शिकाऊ उमेदवारी प्रमाणपत्र देण्यात येते. उत्तीर्ण उमेदवारांना विविध औद्योगिक आस्थापनांमध्ये तसेच शासकीय, निमशासकिय आस्थापनांमध्ये नोकरीच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होतात, असे प्राचार्य साबळे यांनी सांगितले. तरी इच्छूक पुणे जिल्ह्यातील सर्व महापालिका, शासकिय, खासगी आयटीआयमधीय प्रशिक्षित उमेदवारांनी व संबंधित निदेशकांनी या मेळाव्यास वेळेत उपस्‍थित राहून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य साबळे व सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार डी. एन. गरदडे यांनी केले आहे.

loading image
go to top