पिंपरीत 4 हजार 800चं रेमडेसिव्हीर 11 हजारांना; चौघांना अटक

remdesivir injection price black market four arrested in pune
remdesivir injection price black market four arrested in pune

पिंपरी : रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या चौघांना पिंपरी-चिंचवड येथे अटक करण्यात आली आहे. सांगवी परिसरातून चौघांना अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून तीन रेमडेसिव्हीर इंजेक्शनसह चार मोबाईल, एक स्कूटर असा एक लाख 74 हजार रुपयांची मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपी, 4 हजार 800 रुपये किमतीचं रेमडेसिव्हीर इंजेक्शन 11 हजार रुपयांना विकत असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरून, सामाजिक सुरक्षा पथकाने सांगवी पोलिसांमार्फत ही कारवाई केली आहे. या संदर्भात अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक भाग्यश्री अभिराम यादव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार औषध किंमत नियंत्रण आदेशातील कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदित्य दिगंबर मैदर्गी (वय 24, रा. आंबेडकर चौक, पिंपरी), प्रताप सुनील जाधवर (24, रा. तळेगाव दाभाडे, ता. मावळ), अजय गुरुदेव मोराळे (25, समता नगर, सांगवी), मुरलीधर सुभाष मारुटवकर (24, हायस्ट्रीट होस्टेल, बाणेर), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

बाणेरच्या कोविड सेंटरमधून घेतली इंजेक्शन
या संदर्भात सांगवी पोलिसांकडून मिळाली माहिती अशी, आरोपी आदित्य, प्रताप, मुरलीधर आणि अजय चौघांनी बाणेरच्या कोविड सेंटरमधून अवैध मार्गाने रेमडेसिव्हीर इंजेक्शन मिळवली होती. त्या इंजेक्शनचा काळा बाजार करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाला मिळाली होती. चौघेजण मिळून एक इंजेक्शन 11 हजार रुपयांना विक्री करत होते. तसेच, डॉक्टरांच्या कोणत्याही प्रिस्क्रीप्शन शिवाय तसेच कोविड तपासणी शिवाय या इंजेक्शनची विक्री करण्यात येत होती. मुळात पुणे आणि पिंपरी-चिंचवड देशातील सर्वाधिक कोरोना पेशंट आहेत. दोन्ही शहरांत कोरोनाचा प्रसार अतिशय वेगानं होत आहे. बहुतांश कोरना रुग्ण होम क्वारंटाईन असले तरी, गंभीर रुग्णांवर उपचारासाठी रेमडेसिव्हीर इंजेक्शनची गरज भासत आहे. मोठ्या प्रमाणावर रुग्ण असल्यामुळं रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. अशातच शहरात इंजेक्शनचा काळाबाजार सुरू असल्याची चर्चा होती. या चौघांच्या अटकेनंतर पुण्यात रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा काळा बाजार होत असल्याचं स्पष्ट झालंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com