मुळशीकरांसाठी चांगली बातमी; कोरोनाबाधितांसाठी 'सिम्बॉयसिस'मध्ये आता राखीव वॉर्ड

मुळशीकरांसाठी चांगली बातमी; कोरोनाबाधितांसाठी 'सिम्बॉयसिस'मध्ये आता राखीव वॉर्ड

हिंजवडी : मुळशी तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांना नांदे येथील सिम्बॉयसिस रुग्णालयात ३० बेडचा एक राखीव वॉर्ड  मिळणार असून, सर्वसामान्य रुग्णांवर महात्मा फुले आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार होणार आहेत. मुळशीतील पत्रकारांनी प्रशासनासह लोकप्रतिनिधीकडे केलेल्या या मागणीला यश आले आहे. यासाठी आमदार संग्राम थोपटे यांनी प्रयत्न करतअवघ्या काही तासांत हा प्रश्न मार्गी लावला. 

आयटी परिसरासह मुळशी तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तसेच, या रुग्णांवर उपचारासाठी तालुक्यात कुठलेही  शासकीय रुग्णालय नाही. तालुक्यात असलेल्या सिम्बॉयसिस रुग्णालयात मुळशी तालुक्यातील कोरोना बाधितांसाठी राखीव बेड असावेत तसेच, रुग्णांवर मोफत उपचार मिळावेत अशी मागणी मुळशीतील पत्रकारांनी आमदार थोपटे यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे व तहसीलदार अभय चव्हाण यांच्याकडे केली होती. पत्रकार रमेश ससार, संजय दुधाने, विनोद माझिरे, दिपक सोनवणे, प्रवीण सातव, सागर शितोळे व शांताराम इंगवले यांनी हे निवेदन दिले होते.          

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा                

दरम्यान, पत्रकारांच्या प्रतिनिधींनी आमदार संग्राम थोपटे यांना मुळशीच्या कोविड रुग्णांच्या उपचाराबाबत येणाऱ्या अडचणीसंदर्भात माहिती दिली होती. त्यानुसार थोपटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद व  सिम्बॉयसिसच्या प्रशासनाशी चर्चा केली व मुळशीकरांचा प्रश्न मार्गी लावला. गुरुवारी (ता. 9) थोपटे यांच्या शिष्टमंडळाने हॉस्पिटलच्या प्रशासनाची भेट घेतली. तसेच, मुळशीकरांच्या या मागणीबाबत चर्चाही केली. या शिष्टमंडळात पत्रकार रमेश ससार, संजय दुधाणे, विनोद माझिरे, प्रवीण सातव, मुळशी तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष गंगाराम मातेरे, युवक अध्यक्ष सुहास भोते, जिल्हा सरचिटणीस दादाराम मांडेकर यांचा समावेश होता. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

शिष्टमंडळाने हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. विजय नटराजन, कोविड विभागाच्या प्रमुख डॉ. खुशाली रात्रा यांच्याशी विस्तृतपणे चर्चा केल्यावर मुळशीतील कोरोना बाधित रुग्णांसाठी ३० बेडचा एक वेगळा वार्ड राखीव करण्याचे निश्चित झाले. यावेळी थोपटे यांनीही मोबाईलद्वारे संपर्क साधून या प्रश्नावर तोडगा काढला . मात्र, सर्वसामान्य रुग्णांवर  उपचार करण्यासाठी  राज्य सरकारने घालून दिलेले निकष वेळोवेळी बदलले. त्यामुळे रुग्णांवर उपचार करताना अनेक निर्बंध येतात, असे डॉ. विजय नटराजन, डॉ. खुशाली रात्रा यांनी सांगितले. यावेळी त्यांनी 30 बेडच्या स्वतंत्र कक्षाला मान्यता देत मुळशीकरांकडून सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली .

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com