तिनं तान्हुल्याला सांभाळून पटकाविला बारावीत दुसरा क्रमांक; चिंचवडमधील या महिलेची कहाणी वाचा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जुलै 2020

लग्न झाल्यानंतर महिलांना शिकता येत नाही. पण, सासूने साथ दिली.

पिंपरी : विवाहानंतर शिकता येत नाही. चूल आणि मूल हीच आपसूकच जबाबदारी होऊन जाते. परंतु, ती दहावी परीक्षेदरम्यान प्रसूत झाली. तरीही दोन दिवसाच्या बाळाला घेऊन पेपर दिले अन् प्रथम आली. आज रेशम कांबळे-लोहारकर या 59.38 टक्के मिळवून बारावी उत्तीर्ण झाल्या असून, त्यांनी शाळेत दुसरा क्रमांक पटकावला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

लग्नाला आठ वर्षे झाली. पण स्वत:च्या शिक्षणाचे अर्धवट राहिलेले स्वप्न पूर्ण करण्याची धडपड होती. सावत्र आईमुळे शिकता आले नाही. शिक्षण कमी असल्यामुळे नोकरी मिळाली नाही. त्यामुळे नोकरीसाठी शिक्षण किती महत्त्वाचे असते, हे समजल्यावर चिंचवड आनंदनगरमध्ये कांबळे यांनी रात्रप्रशालेत प्रवेश घेतला. पण तीन महिन्यांनी गर्भवती असल्याचे समजले. पण रात्रप्रशालेतील सर्वच शिक्षकांनी समजून घेतल्यामुळे दहावी उत्तीर्ण झाले. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लग्न झाल्यानंतर महिलांना शिकता येत नाही. पण, सासूने साथ दिली. झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाची मानसिकता वेगळीच असते. परंतु, घर सांभाळून काम केले. बारावीला भरण्यासाठी शुल्क नव्हते. सातपुते या शिक्षकांनी माझ्यासह चार मुलींचे पैसे भरले. तान्हं बाळाला सांभाळून दररोज तीन तास अभ्यासाला दिले. त्याचेच फलित म्हणून 59.38 टक्के मिळवून शाळेत दुसरी आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: resham kamble loharkar passed hsc with 59.38 percent