निर्बंध उठले; शहर गजबजले

शहरातील अर्थचक्राला चालना मिळणार असल्याने बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आणि खाणावळीतदेखील खवय्यांची गर्दी उसळली होती.
pune
puneesakal
Updated on

पिंपरी : कोरोनाच्या दुसऱ्यालाटेच्या दाहकतेमुळे लॉकडाउनच्या कचाट्यात अडकलेल्या शहरवासियांची सोमवार पासून निर्बंधातून सुटका झाली. या संकटामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून अर्धबंद असणारे शहर पूर्णतः उघडले होते. रात्री आठवाजेपर्यंत संपूर्ण शहर खुले ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिल्याने शहर सकाळपासूनच गजबजले होते. शहरातील अर्थचक्राला चालना मिळणार असल्याने बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर खरेदीचा उत्साह पाहायला मिळाला. सर्व रेस्टॉरंट, हॉटेल आणि खाणावळीतदेखील खवय्यांची गर्दी उसळली होती. सकाळी नऊवाजेपर्यंत संपूर्ण बाजारपेठ उघडल्याने शहरात कोरोनाकाळापूर्वीचे चैतन्य पाहायला मिळाले. (PCMC News)

pune
मूक मोर्चाची पाच वर्ष! घटनेच्या चौकटीत बसणारे हवे मराठा आरक्षण

कोरोनाच्या पहिल्यापेक्षा दुसऱ्या लाटेचा शहरवासीयांना अधिक फटका बसला. मार्च, एप्रिल व मे महिन्यात वाढती रूग्णसंख्या आणि मृत्यूचे प्रमाण यामुळे शहर भयभीत झाले होते. त्यातच कोरोनानंतर म्युकरमायकोसिसमुळे मृत्यू होवू लागल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला होता. आता परिस्थिती बदलल्याने निर्बंध उठविल्यामुळे सोमवारपासून व्यापारी, व्यावसायिकांना नवी उभारी मिळाली आहे. व्यापारी, हॉकर्स, किरकोळ विक्रेते, हॉटेल्स, रेस्टॉरंट, मॉल रात्री आठवाजेपर्यंत खुली राहणार आहेत. रस्त्यावरील अनेक दुकानांमध्ये सॅनिटायझर, थर्मल गनची व्यवस्था करण्यात आली होती.

pune
तरुणावर टोळक्याकडून अंदाधुंद गोळीबार

त्याचबरोबर बहुतांश ठिकाणी ग्राहकही रांगेत थांबून सुरक्षित अंतराचा निकष पाळत असल्याचे दिसून आले. सकाळपासूनच नागरिकांनीही खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये धाव घेतली. कपडे, पादत्राणे, कटलरी, बल्ब-ट्युबसारख्या इलेक्ट्रिकल वस्तूंची खरेदी, इस्त्री-गिझर-मिक्सर सारख्या उपकरणांची दुरुस्ती त्याचबरोबर मोबाईल फोनसह, कॉम्प्युटर, लॅपटॉपची खरेदी-दुरुस्तीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठी होती.

pune
शरद पवार आणि अलका कुबल यांची बारामतीत भेट

एकूणच सकाळपासून पिंपरी कॅम्प, काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, चिंचवड, प्राधिकरण, निगडी, आकुर्डी, भोसरी आदी बाजारपेठांमध्ये चैतन्य फुलले होते. रहदारी, दळणवळण सुरू झाल्याने प्रत्‍येकाला हायसे वाटले होते. व्यवहाराला आगाऊ वेळ मिळाल्याने अनेकांच्या चेहरे आनंदले होते.

खवय्यांची उसळली गर्दी

शहरात काही प्रसिद्ध खाऊगल्लीत वडापाव, मिसळपाव, इडली -डोसा -उताप्पा, मुगाची भजी, पावभाजी, पुरी भाजी खाणाऱ्या खवय्यांची गर्दी सकाळीच उसळली होती. संत तुकाराम नगर, पिंपरी शगुन चौक, डांगे चौक, मासुळकर कॉलनी, मोरवाडी -म्हाडा रस्ता परिसरात लागणाऱ्या हातगाड्यांवर आस्वाद घेताना दिसले. शहरातील सर्व रेस्टॉरंट, हॉटेल, खानावळ यांना ५० टक्के आसन क्षमतेसह सकाळी नऊनंतर उघडण्यात आली होती. विविध खाण्याच्या ठिकाणी नागरिक सकाळीच तुटून पडल्याचे पाहायला मिळाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com