Court
Courtesakal

पिंपरी शहरातील २२३७ प्रकरणे निकाल

पिंपरी व आकुर्डीत लोकन्यायालय; १० कोटी ६२ लाख महसूल जमा

पिंपरी : जिल्हा विधी प्राधिकरण, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशन आणि दिवाणी व फौजदारी न्यायालय यांच्यातर्फे आयोजित लोकन्यायालयात दोन हजार २३७ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्या माध्यमातून १० कोटी ६२ लाख ७७ हजार ७४३ रुपये महसूल जमा झाला.

पिंपरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात २३२ आणि महापालिकेच्या आकुर्डी येथील न्यायालयात दोन हजार पाच खटले निकाली काढण्यात आले. त्यात अनुक्रमे एक कोटी ५४ लाख ६६ हजार ७७ आणि नऊ कोटी आठ लाख ११ हजार ६६६ रुपये महसूल जमा झाला. ॲड. सुभाष चिंचवडे, ॲड. सचिन थोपटे, मुख्य न्यायाधीश डी. आर. पठाण, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. वानखेडे, आर. आर. काळे, पी. सी. फटाले, एन. टी. भोसले यांच्या हस्ते उद्घाटन झाले. पॅनेल ॲडव्होकेट म्हणून जितसंकल्प शिंदे, मंगेश नढे, नितीन मोरे, दीपाली राऊत, दशरथ बावकर, पवन गायकवाड, योगिता तपळे, श्रुतिका नेवाळे, अक्षय केदार, जैनब शेख, स्वप्नजा सोनवणे, वर्षा मोटे यांनी काम पाहिले.

न्यायाधीश पठाण यांनी लोकअदालत व त्याचे महत्त्व सांगितले. जास्तीतजास्त पक्षकारांनी या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहनही केले. सरकारी वकील साधना बोरकर यांचा सत्कार केला. पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष संजय दातीर पाटील, सुनील कडुसकर, सुदाम साने, दिनकर बारणे, पिंपरी- खेड- मावळ नोटरी असोसिएशनचे अध्यक्ष अतीश लांडगे, प्रतीक जगताप, गोरख कुंभार, संगीता परब, रूपाली वाघेरे, महेश टेमगिरे, धनंजय कोकणे आदी उपस्थित होते. ॲड. निखिल बोडके यांनी सूत्रसंचालन केले. ॲड. प्रियांका सुरवसे यांनी आभार मानले. ॲडव्होकेट बार असोसिएशनचे पदाधिकारी गौरव वाळूंज, सुनील रानवडे, अनिल पवार, गोरख मकासरे, मंगेश खराबे, महेश मासुळकर, स्नेहा कांबळे, सारिका मोरे, ऐश्वर्या शिरसाठ, संतोषी काळभोर यांनी संयोजन केले.

अशी होती प्रकरणे

दिवाणी व फौजदारी स्वरूपाच्या खटल्यांसह धनादेश न वटणे, मिळकतकर व पाणीपट्टी थकबाकी अशा स्वरूपाचे प्रलंबित खटले तडजोडीसाठी लोकन्यायालयात ठेवले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com