

From Borders to Bhakti: Retired Soldiers Embrace Spiritual Path in Alandi
Sakal
आळंदी : देशसेवेत आयुष्य व्यतीत केलेल्या माजी सैनिकांनी निवृत्तीनंतर भक्तीचा मार्ग स्वीकारल्याचे चित्र सध्या संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर येथे पाहायला मिळत आहे. राज्यभरातील सुमारे दीडशे माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांनी एकत्र येत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाला प्रारंभ केला. सकाळी पारायण तर सायंकाळी कीर्तन व हरिपाठ अशा धार्मिक उपक्रमांत हे माजी सैनिक भक्तीत दंग होत आहेत.