
टाकवे बुद्रुक : मावळ तालुक्यात चारचाकी वाहनांची संख्या वाढत आहे. आपले वाहन इतरांपेक्षा वेगळे दिसावे त्यासाठी फिल्म लावून काचा काळ्या करणे, हेडलाइट्समध्ये एलईडी दिवे बसविणे असे प्रकार होत आहेत. ते इतरांसाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या दिव्यांच्या विक्रीवर बंदी घालावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक, कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.