
पिंपरी : पूजा उच्चशिक्षित तरुणी. वय 26. एमबीए. एच.आर (संसाधन) झालं आहे. निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीमधील कुटुंब. मुलीला नामाकिंत विमान कंपनीत नोकरीसाठी ऑनलाइन कॉल आल्याने सर्वजण भारावून गेले. कंपनीकडून लवकरच ट्रेनिंग होऊन वर्षाकाठी सर्व सुविधांसह 4.2 लाख पॅकेज ऑफरही मिळाली. मात्र, कंपनीकडून ट्रेनिंगसाठी शुल्क आकारले जाणार असल्याचे तिला सांगितलं गेलं. अन् जे अपेक्षित नव्हतं तेच घडलं.
पूजा यांना 31 जुलैला नोकरीसाठी कॉल आला. शाईन डॉट कॉमवरुन प्रोफाइल पाहिल्याचं सांगितलं. इंडिगो एअरलाइन्स कंपनीत कस्टमर सर्व्हिस एजंट म्हणून संधी आहे. साडे चार लाखाचं पॅकेज आहे. दहा दिवसाचं ट्रेनिंग घेतलं जाईल. त्यानंतर तुमची निवड होईल. हे ट्रेनिंग मुंबई विमानतळावर होईल. त्यासाठी तुम्हांला काही कागदपत्रे द्यावी लागतील. कंपनीकडून पिकअप आणि ड्रॉपची सेवा आहे. कंपनीकडून लॅपटॉप, मोबाईल, युनिफॉर्म, आयकार्ड राहण्याची सोय केली जाणार आहे. तसे पत्र व वस्तू कुरिअरद्वारे घरच्या पत्त्यावर मिळतील, असे राकेश कुमार पांडा (मो नंबर : 9899939406)या कंपनीच्या ट्रेनिंग व्यवस्थापकाने मोबाईलवरुन सांगितलं. विमान कंपनीतील मनुष्यबळ विभागातील लावण्या सिंग तुम्हांला याबद्दल विस्तृत सांगतील. मात्र, तत्पुर्वी ट्रेनिंगसाठी तुम्हांला पैसे भरावे लागतील. त्यासंदर्भात लेखा विभागाचे अंशुल परासार संपर्क साधतील. तुम्हांला मान्य आहे का?
पूजा यांनी ऑफर लगेच स्वीकारली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इराम खान या महिलेने टेलिफोनिक मुलाखतीसाठी पूजा यांना कॉल केला. जॉब बद्दल सर्व माहिती दिली. त्यानंतर राकेश पांडा यांनी पूजा यांना पुन्हा कॉल करून ट्रेनिंगची रक्कम अद्यापपर्यंत भरली नसल्याचे सांगितले. त्यानंतर पूजा यांनी त्वरीत अकाऊंट मॅनेजरच्या खात्यावर (खाते क्र. आयसीसीआय बॅंक - 164001508144 )20 हजार रुपये ट्रान्सफर केले. ती रक्कम ट्रान्सफर झाल्यानंतर पांडा यांनी 19 ऑगस्टला तुम्हांला मुंबईला यावे लागेल. 20 ऑगस्टपासून ट्रेनिंग सुरु होणार असल्याचे सांगितले. काही अडचण असल्यास 9873922722 या हेल्पलाइनवर संपर्क करण्यास सांगण्यात आले. त्यानंतर पूजा यांना मूळ कागदपत्रे पाठविण्यास सांगितले. मात्र, पूजा यांनी ट्रेनिंगच्यावेळी कागदपत्रे देऊ असे सांगितले.
असं टळले विघ्न
पूजाला कामकाजाबद्दल शंका आली. त्यांनी इंडिगो एअरलाइन्सची वेबसाईट पाहिली. त्यांच्या निदर्शनास आले की, 'विमान कपंनीच्या नावाखाली फेक कॉल येत आहेत. कोणतीही जाहिरात किंवा जागा रिक्त नाहीत. त्यानंतर अचानक तिसऱ्या दिवशी त्यांच्या बॅंक खात्यातून 18 हजार 500 रुपये कट झाले. पूजा यांनी तत्काळ सायबर क्राईम व निगडी पोलिस ठाण्याला अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल केला. बॅंकेतही तक्रार करुन खाते बंद केले. एकूण 38 हजार 500 रुपये त्यांचे गेले. मात्र पुढील धोका टळला. परंतु, चोरट्याला खबर नसल्याने तो अजूनही ऑनलाइन असल्याचे पूजा यांनी सांगितले.
नोकरीच्या बहाण्याने मिळाली ही बनावट कागदपत्रे -
कंपनीचे ऑफर लेटर लोगोसहित
मॅनेजरचे आधारकार्ड, पॅनकार्ड
ट्रेनिंगचे पत्र
(Edited by : Sagar Diliprao Shelar)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.