
वाकड: चिंचवड विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या प्रचारार्थ वाल्हेकरवाडीत आमदार रोहित पवार यांची सभा झाली. त्यावेळी महापालिका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष नवनाथ जगताप आणि मराठवाडा विकास महासंघाचे अध्यक्ष अरुण पवार यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.