
तुम्हाला 'रुबिक्स क्यूब' हा खेळ माहिताय का? त्याने बुद्धीला चालना मिळून चित्त एकाग्र होण्यास मदत होते. परंतु, अबालवृद्धांना हे क्यूब सहज सोडविणं शक्य होत नाही.
VIDEO : बघावं ते नवलंच...रुबिक्स क्यूबचा 'हा' तर बादशाह!
पिंपरी : तुम्हाला 'रुबिक्स क्यूब' हा खेळ माहिताय का? त्याने बुद्धीला चालना मिळून चित्त एकाग्र होण्यास मदत होते. परंतु, अबालवृद्धांना हे क्यूब सहज सोडविणं शक्य होत नाही. मात्र, पिंपळे निलख येथील 12 वर्षीय अर्जुन माहुली हा जलदगतीने अवघ्या काही सेकंदामध्ये क्यूब सोडवितो. केवळ एवढंच नाही, तर एका हातानेही किंवा डोळ्यावर पट्टी बांधूनदेखील क्यूब सोडविण्याकडे त्याची वाटचाल सुरू आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विदेशामध्ये रुबिक्स क्यूब म्हणजेच मॅजिक क्यूबचा शोध लागला. हे खेळणे एक प्रकारचे कोडे आहे. त्यातील विविध रंगांच्या चौकोनांची एकसारखी रंगसंगती करणे, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट असते. अनेक जणांना हे कोडे सोडविता येत नाही. काही जणांना हे सोडविता येते. परंतु, त्याला खूप वेळ लागतो. मात्र, पिंपळे निलख येथील अर्जुन माहुली याने "रुबिक्स क्यूब'वर हुकूमत मिळविली आहे. विविध प्रकाराचे क्यूब सोडविण्यासाठी त्याला 1.2 सेकंदांपासून 2 मिनिटे इतका अवधी लागतो.
पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
या खेळाविषयी अर्जुनचे वडील अजित माहुली म्हणाले, "माझ्या मित्राचा मुलगा क्युबिंग करत असायचा. त्याचे पाहून अर्जुनला क्युबिंग करण्याची आवड लागली. इंटरनेटवरुन क्यूबिंगचे अल्गोरिदम म्हणजे गणनपद्धती डाऊनलोड करुन तो शिकू लागला. सध्या तो सहा प्रकारपेक्षा जास्त क्यूब कमी वेळात सोडवितोय. मुंबई येथे जागतिक क्यूब संघटनेच्या मान्यतेने स्पर्धा होत असते. वेळेत आणखी सुधारणा झाल्यावर त्यामध्ये भाग घेण्याचे त्याचे ध्येय आहे.''
अर्जुन याने 2 बाय 2 प्रकारचा क्यूब 1.2 सेकंद, 3 बाय 3 चा क्यूब सोडविण्यासाठी 8.78 सेकंद, 4 बाय 4 प्रकारचा क्यूब 55 सेकंद तर 5 बाय 5 चा क्यूब सोडविण्यासाठी 2 मिनिटे इतकी सर्वोत्तम वैयक्तिक वेळ नोंदविली आहे. मेगा पिक्स क्यूब 1 मिनिटे 30 सेकंद तर पिरॅमिड क्यूब 3 सेकंदांत त्याने सोडविला आहे.
क्रिकेट, स्क्वॅश आणि जलतरणाचीही आवड
थेरगाव येथील व्हेरॉक-वेंगसरकर क्रिकेट अकादमीमध्ये अर्जुन क्रिकेटचे प्रशिक्षण घेत असून त्याला क्यूबबरोबरच जलतरण, स्क्वॅश खेळाचीही आवड आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
"एका हाताने मी 3 बाय 3 प्रकारचा क्यूब 26 सेकंदांत सोडविला आहे. 2 बाय 2 आणि 3 बाय 3 प्रकारचे क्यूब डोळ्यावर पट्टी बांधूनही सोडवित आहे. त्यामध्ये, मला चांगले यश देखील येत आहे.''
- अर्जुन माहुली, "रुबिक्स क्यूब' खेळाडू
Web Title: Rubiks Cube Making Only Few Second Arjun Mahuli Pimple Nilakh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..