- बेलाजी पात्रेवाकड - मुंबई-बंगळूरु महामार्गावरील सेवा रस्त्यावर धावत्या मोटारीने अचानक पेट घेतल्याची दुर्घटना मंगळवारी (ता. ४) सायंकाळी पाचच्या सुमारास भूमकर चौकातील जाग्वार शोरूम समोर घडली..समयसूचकता दाखवीत चालकाने सर्वांना मोटारीतुन खाली उतरवल्याने मोठा अनर्थ टळला. या दुर्घटनेतसुदैवाने कोणालाही ईजा झाली नाही..घटनास्थळी वाहतूक आणि वाकड पोलीस तसेच अग्निशामक दलाचे जवान दाखल झाले असून, आग विझवण्याचे काम चालू आहे. अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी पोहचेपर्यंत बहुतेक मोटार जळून खाक झाली होती..या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी झाली असून, बघ्यांची देखील प्रचंड गर्दी झाली आहे. ही आग लागण्यामागील नेमके कारण समजू शकले नाही..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.