Ashadhi Wari : ‘साथ चल’ उपक्रमात संकल्प आरोग्याचा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Saath Chal

‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या ‘साथ चल’ उपक्रमातील आरोग्य दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला.

Ashadhi Wari : ‘साथ चल’ उपक्रमात संकल्प आरोग्याचा

पिंपरी - ‘सकाळ माध्यम समूह’ आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या ‘साथ चल’ उपक्रमातील आरोग्य दिंडीला पिंपरी-चिंचवड शहरातून उदंड प्रतिसाद मिळाला. आषाढी वारीनिमित्त देहू येथून पंढरपूरकडे निघालेला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी (ता. २२) आकुर्डीतील मुक्काम संपवून पुण्याकडे मार्गस्थ झाला. त्यावेळी ‘साथ चल’ उपक्रमात उद्योजक, डॉक्‍टर्स, अभियंते, लेखक, कवी, कलाकार, राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांसह असंख्य संस्था, संघटना, हाउसिंग सोसायट्या, शाळा-महाविद्यालयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांनी आरोग्य संगोपनाची शपथ घेतली.

फिनोलेक्‍स केबल्सचे कार्यकारी अध्यक्ष दीपक छाब्रिया यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘साथ चल’ उपक्रमास मोरवाडी चौकातील फिनोलेक्स कंपनीसमोर प्रारंभ झाला. ‘वारी विठुरायाची आणि आरोग्याच्या संगोपनाची’ असा संदेश देत दिंडी चालत होती. संत तुकाराम महाराज संस्‍थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सोहळाप्रमुख भानुदास महाराज मोरे, फिनोलेक्स केबल्सचे अध्यक्ष अमित माथूर सहभागी झाले होते. एचए कंपनी वसाहतीजवळील भुयारी मार्गापर्यंत दिंडी आली. त्या ठिकाणी पुन्हा शपथ घेण्यात आली. वांगी येथील (ता. माजलगाव, जि. बिड) सद्गुरू नारायण बाबा प्रासादिक दिंडीने जागर केला.

कीर्तनकार बब्रुवान महाराज वाघ, मोरे दादा, व्यंगीज ग्रूपचे गुणवत्ता नियंत्रण विभाग प्रमुख संभाजी पाटील, महाराष्ट्र फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, अध्यात्मिक क्षेत्रातील कार्यकर्ते शेखर कुटे, ज्ञानेश्वर मलशेट्टी, दिलासा संस्थेचे संस्थापक सुरेश कंक, मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीचे अण्णा जोगदंड, संजना करजावले, मुरलीधर दळवी, हणुमंत पंडित, वसंतराव चकटे, संगीता जोगदंड, विश्व सिंधी सेवा संघमचे मनोहर जेठवानी, अजित कंजवानी, किरण रामनानी, मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघाचे बी. आर. माडगुळकर, एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रामदास माळी, महापालिका आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, महापालिका शिक्षण मंडळ माजी सभापती अर्जुन ठाकरे, कामगार नेते विश्वनाथ शिंदे, शरद कुंभार, कृष्णकांत सुतार, राम ताकभाते, अरुण शिंदे, विजय कुलकर्णी, सतीश शिंदे.

शाळा, महाविद्यालये...

डॉ. डी. वाय. पाटील आर्ट्‌स कॉमर्स सायन्स कॉलेज पिंपरी, एमयुसीसी महाविद्यालय पिंपरी, श्री भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भोसरी, एटीएसएस महाविद्यालय चिंचवड, संघवी केशरी महाविद्यालय चिंचवड, आर. एम. धारिवाल महाविद्यालय चिंचवड, प्रतिभा इन्स्टिट्यूट आकुर्डी, औद्योगिक शिक्षण मंडळाचे (एएसएम) महाविद्यालय पिंपरी, डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासिटिकल सायन्स अँड रिसर्च पिंपरी, एसएनबीपी विधी महाविद्यालय मोरवाडी पिंपरी, एसएनबीपी आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मोरवाडी पिंपरी, एसएनबीपी स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज मोरवाडी पिंपरी, सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी सुदुंबरे, महापालिका आयटीआय मोरवाडी, गेंदीबाई चोपडा स्कूल व ज्युनिअर कॉलेज.

संस्था, संघटना...

सिझन सोशल वेल्फेअर ट्रस्ट सांगवी, प्रशांत शितोळे मित्र परिवार सांगवी, शिवजिजाऊ महिला प्रतिष्ठान सांगवी, श्री संत गजानन महाराज सर्व न्यास सेवा ट्रस्ट, डोनेट एड सोसायटी, ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशन, फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन सांगवी, तनिष्का महिला व्यासपीठ सांगवी, बालाजी महिला प्रतिष्ठान सांगवी, इंडो आथलेटिक्स सोसायटी, शब्दधन काव्यमंत, दिलासा संस्था, साहित्य संवर्धन समिती, पोलिस मित्र संघटना, मराठवाडा जनविकास संघ, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती, ओम साई फाउंडेशन, डोळस सोशल फाउंडेशन, नमो प्रतिष्ठान, राजीव गांधी प्रतिष्ठान, फिनोलेक्स केबल्स कामगार, मोरवाडी ज्येष्ठ नागरिक संघ, अजमेरा मासुळकर कॉलनी ज्येष्ठ नागरिक संघ, संत तुकारामनगर ज्येष्ठ नागरिक संघ, प्रगती जैन सोशल ग्रूप उद्यमनगर, विश्व सिंधी समाज संघ, एम्पायर इस्टेट ज्येष्ठ नागरिक संघ, पतंजली, युई टु गेदर, महाराष्ट्र फेरीवाला महासंघ, पुणे जिल्हा महिला मानव अधिकार संघ, मोशी.

Web Title: Saath Chal Ashadhi Wari Health Care Pimpri Chinchwad Sakal Media Group Finolex Cable

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top