Sakal Impact : जुनी सांगवीतील 'या' पुतळ्याच्या सुशोभीकरणास अखेर सुरुवात

सकाळ वृत्तसेवा
Friday, 10 July 2020

माणसं तर माणसं, चौकातील पुतळ्यांचीही लॉकडाउनमुळे कामे रखडली होती. 

जुनी सांगवी (पुणे) : कोरोना संकट दिवसेंदिवस आधिक गडद होताना दिसत आहे. माणसं या संकटामुळे मेटाकुटीस आली आहेत. आता काही प्रमाणात शिथिल केलेल्या लॉकडाउननंतरही परिस्थिती अवघड झाली आहे. सर्वसामान्यांची आर्थिककोंडी झाली आहे. यातून तग धरायचं कसं, हा सर्व सामान्यांनासमोर प्रश्न उभा आहे. माणसं महामारीच्या संकटापुढे हतबल झाली आहेत. हाताला काम नाही. असंघटीत घरेलू कामगार, बांधकाम मजूर, गवंडी, रंगारी, छोटा लघू उद्योजक, सेवा उद्योग बंद असल्याने सर्व क्षेत्रातील कामगारांची या काळात परवड झाली आहे. माणसं तर माणसं मात्र, चौकातील पुतळ्यांनाही कोरोनामुळे लावलेल्या लॉकडाउनमुळे कामे रखडली होती. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या बाबत मंगळवारी (ता. ७) 'सकाळ'मध्ये सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. जुनी सांगवी-दापोडीला जोडणाऱ्या पवना नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळील व जुनी सांगवीच्या पुर्व प्रवेशद्वारावर असलेल्या महाराष्ट्राच्या राजकारणातील अष्टपैलू व्यक्तिमत्व पद्मभूषण वसंतदादा पाटील यांचा या चौकात पुतळा आहे. मात्र, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून सुशोभीकरणाच्या नावाखाली पुतळ्याचे काम रखडल्याने तो झाकलेला आहे. काही प्रमाणात काम सुरू होऊन पुन्हा लॉकडाउन लागल्याने अर्धवट काम पुन्हा सुरू करण्यात आले आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जुनी सांगवीचे पुर्वेचे प्रवेशद्वार म्हणून याची ओळख आहे. येथील चौक सुशोभीकरण कामाच्या निविदा काढून पालिका स्थापत्य विभागाकडून या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम गेल्या सात-आठ महिन्यांपूर्वी हाती घेण्यात आले होते. सुमारे अठरा लाख रुपये अपेक्षित खर्चात मेघडंबरी, ग्रेनाईट बसविणे, विद्युतीकरण व इतर सुशोभीकरणाच्या गोष्टी येथे करण्यात येणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal impact news about vasantdada patil statue in juni sangavi