Sakal Kirtan Mahotsav : संतविचाराने जगण्यातच साफल्य! विशाल महाराज खोले यांचा संदेश

‘माणूस हा अनुकरणशील आहे. पण, कोणाच्या मागे जावे, कोणाच्या मागे जाऊ नये, हे कळलं पाहिजे. पुण्याच्या मागे जा. हे पुण्य संत विचारात आहे.
Vishal maharaj Khole
Vishal maharaj Kholesakal

पिंपरी - ‘माणूस हा अनुकरणशील आहे. पण, कोणाच्या मागे जावे, कोणाच्या मागे जाऊ नये, हे कळलं पाहिजे. पुण्याच्या मागे जा. हे पुण्य संत विचारात आहे. त्यामुळे संतांच्या मागे जाण्यातच जीवनाचे साफल्य आहे,’’ असा मौलिक संदेश मुक्ताईनगर येथील कीर्तनकार विशाल महाराज खोले यांनी दिला.

पंढरपूर येथील कार्तिकी वारी, आळंदी येथील संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळा आणि ‘सकाळ’ पिंपरी-चिंचवडचा ३१ वा वर्धापनदिन यानिमित्त कीर्तन महोत्सव आयोजित केला होता. त्याच्या समारोपाची कीर्तनसेवा चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात विशाल महाराज खोले यांनी केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल-रुक्मिणी, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तींना पुष्प अर्पण करून नतमस्तक होत, त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्या,

संत मारगीं चालती।

त्यांची लागो मज माती।।

काय करावीं साधनें।

काय एक नव्हे तेणें ॥२॥...

या अभंगाचे निरूपण केले. ते म्हणाले, ‘‘संत आपले मायबाप आहेत. पण, त्यांचे विचार ऐकायला भाग्य लागतं. संतांची कृपा असावी लागते. संतांचे विचार आताच्या मुलांपर्यंत पोहचावे लागतील. त्यासाठी तुम्ही, आम्ही सर्वांनी संत विचार घराघरांत पोहोचवले पाहिजेत.’’

‘सकाळ’ने वारी घराघरांत पोचवली

कीर्तन महोत्सव आयोजित करण्याचं मनात आलं. त्यामुळे ‘सकाळ’ला द्यावे तेवढे धन्यवाद कमीच आहेत. कोविड काळात ‘सकाळ’ने संतांची आषाढी वारी घराघरांत पोहोचवली. काळ बदलत आहे. बदलत्या, वाहत्या समाजाला प्रवाहात आणण्याचे काम ‘सकाळ’ने केले, असे मतही खोले महाराज यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र ही चारधाम भूमी

संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर, मुक्ताईनगर ही चार धाम आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या सीमांवर ‘संत भूमी में आपका स्वागत है।’ असे फलक लागावेत, अशी अपेक्षा खोले महाराज यांनी व्यक्त केली. संत ज्ञानेश्वर व संत मुक्ताबाई यांच्या अलौकिक भेटीचा प्रसंग आषाढी वारीच्या निमित्ताने दरवर्षी होत असतो. तो अनुपम्य सोहळा असतो, असेही त्यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com