Sakal Natya Mahotsav 2024 : उन्हाळ्याच्या सुट्टीत नाट्यमहोत्सवाची पर्वणी

सकाळ नाट्यमहोत्सव येत्या शुक्रवारपासून, मोजकीच तिकिटे शिल्लक
Sakal Natya Mahotsav 2024 from friday know detail all you need to know
Sakal Natya Mahotsav 2024 from friday know detail all you need to knowsakal
Updated on

पिंपरी : उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या आहेत. तापमानाचा पारा ४२ अंशांवर जाऊन पोचला आहे. निवडणुकांमुळे राजकीय वातावरणही तापलेले आहे. नेत्यांचे दौरे, सभा यामुळे नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत.

सुट्टीतील निवांत वेळ कुटुंबीयांसोबतही घालवायचा आहे. मात्र, प्रत्येक वेळी थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जाणे सर्वांनाच शक्य होईल असे नाही. अशा वेळी जिथे मनोरंजनही होईल, ताणतणाव दूर होऊन मन प्रसन्न होईल, असा पर्याय शोधला जातो.

म्हणूनच मनोरंजनाचा उत्तम पर्याय ‘सकाळ माध्यम समूहा’ने उपलब्ध करून दिला आहे. शहरातील नाट्यप्रेमींसाठी १० ते १२ मे दरम्यान सकाळ नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लोकप्रिय कलाकारांच्या गाजलेल्या नाटकांचा आस्वाद या वेळी शहरवासीयांना घेता येणार आहे. या महोत्सवामध्येभाऊ कदम, स्पृहा जोशी, संकर्षण कऱ्हाडे, ओंकार भोजने, काजल काटे, प्रिया करमरकर, अमोल कुलकर्णी आदी कलाकारांचा आविष्कार बघायला मिळणार आहे.

Sakal Natya Mahotsav 2024 from friday know detail all you need to know
Sakal Natya Mahotsav : अक्षयतृतीयेनिमित्त ‘सकाळ’तर्फे १० ते १२ मे दरम्यान नाट्य महोत्सवाचे आयोजन

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आलेल्या या नाट्य महोत्सवासाठी ऑनलाइन बुकिंग करता येणार आहे. ‘बुक माय शो’ आणि ‘तिकिटालय’ यावर तिकिटे उपलब्ध आहेत. ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा निखळ मनोरंजनाचा हलका-फुलका प्रयोग १० मे रोजी होईल. ११ मे रोजी ‘तू म्हणशील तसं!’ आणि १२ मे रोजी ‘करून गेलो गाव’ ही नाटकं होतील. संपूर्ण महोत्सवाचे तिकीट घेतल्यास विशेष सवलत दिली जाणार आहे. महोत्सवाचे सहप्रायोजक चिंचवड येथील ऑक्सिकेअर हॉस्पिटल आणि सोमाटणे येथील सुरभी सिटी हे आहेत. तर बुलडाणा अर्बन को. ऑप. क्रेडिट सोसायटी लिमिटेड हे फायनान्स पार्टनर आहेत.

‘सकाळ माध्यम समूहा’कडून सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जातात. या नाट्यमहोत्सवामुळे नाट्यचळवळीला चालना मिळत आहे. रसिकांसाठी ही उत्तम पर्वणी आहे. आम्ही या नाट्यमहोत्सवाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सकाळसोबत जोडले गेलो आहोत. याचा आम्हाला आनंद आहे.

- प्रमोद नरसाळे, संचालक, सुरभी ग्रुप

तिकिटांचे दर (प्रतिव्यक्ती)

  • सीझन तिकीट (तळमजला) ः १००० रुपये

  • सीझन तिकीट (बाल्कनी) ः ८०० रुपये

  • प्रतिनाटक तिकीट (तळमजला) ः ४०० रुपये

  • प्रतिनाटक तिकीट (बाल्कनी) ः ३०० रुपये

महोत्सवाचे वेळापत्रक

  • शुक्रवार (ता. १०) : संकर्षण व्हाया स्पृहा

  • शनिवार (ता. ११) : तू म्हणशील तसं!

  • रविवार (ता. १२) : करून गेलो गाव

नाट्य बुकिंगसाठी...

  • ऑनलाइन बुकिंग ः https://in.bookmyshow.com; www.ticketalay.com/ticketalay app

  • फोन बुकिंग ः ८९७५२३७०४१

  • अधिक माहितीसाठी संपर्क ः सचिन ः ९७३०९५९६९९

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com