पिंपरी - शहराच्या पश्चिम आणि पूर्व भागात बांधकाम क्षेत्र वेगाने विकसित होत आहे. या भागातील डीपी रस्ते विकसित केले जाणार आहेत. त्याचा बांधकाम क्षेत्राला नक्कीच फायदा होईल. ग्राहकांच्या सेवेसाठी ‘सकाळ’ने बांधकाम क्षेत्रातील अनेक कंपन्यांना एका छताखाली आणले, ही कौतुकास्पद बाब आहे, असे गौरवोद्गार पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांनी व्यक्त केले.