Sakal Vidya : तालासुरात झाले अवघड गणित सोपे; ‘सकाळ विद्या’चे १६ मार्चला आठवी ते दहावीसाठी चर्चासत्र

तालासुरात गणित शिकविण्याची अभिनव पद्धत अभिजित भांडारकर यांनी आत्मसात केली आहे.
Sakal Vidya
Sakal Vidyasakal
Updated on

पिंपरी - तालासुरात गणित शिकविण्याची अभिनव पद्धत अभिजित भांडारकर यांनी आत्मसात केली आहे. त्यामुळे आता इयत्ता आठवी, नववी आणि दहावीचे गणित सोपे झाले आहे. माध्यमिक शिक्षणात गणित विषय कसा आनंददायी होईल, यादृष्टीने ‘सकाळ विद्या’ आणि भांडारकर ॲकॅडमी यांच्यातर्फे रविवारी (ता.१६) विनामूल्य चर्चासत्राचे आयोजन केले आहे. या चर्चासत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे गणित सोपे होण्‍यास मदत होणार आहे.

प्राधिकरणातील ग. दि. माडगुळकर सभागृहात सायंकाळी पाच वाजता हे चर्चासत्र विनामूल्य भरविण्यात येणार आहे. चर्चासत्रामध्ये भांडारकर ॲकेडमीचे संस्थापक संचालक अभिजीत भांडारकर सर मार्गदर्शन करणार आहेत.

उच्च शिक्षणातील उत्तुंग भरारीची बीजे ही मुलांच्या माध्यमिक शिक्षणात म्हणजेच सातवी ते दहावीच्या अभ्यासात रुजलेली असतात. बऱ्याचदा गुणवत्ता असूनही केवळ योग्य मार्गदर्शनाचा अभाव, चुकीचे अभ्यासतंत्र यामुळे वर्षभर अभ्यास करूनही विद्यार्थी मागे पडतात. त्यामुळे अभ्यासाचे तंत्र व योग्य गुरूचे मार्गदर्शन मिळणे गरजेचे असते. प्रत्येक गोष्टीला सरावाची गरज असते.

अगदी खेळण्यालाही. गणितही त्याला अपवाद नाही. एकदा का सूत्रे पाठ झाली, गणित सोडवायची पद्धत कळाली की गणित सोपे जाते. गणितातील क्लिष्ट असे हजारापेक्षा जास्त सूत्रे भांडारकर सांगणार आहे. गणित अवघड वाटणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व मुलांचा सर्वांगीण विकास अपेक्षित असणारा हा कार्यक्रम आहे.

चर्चासत्राविषयी...

  • कधी - रविवारी, १६ मार्च २०२५

  • केव्हा - सायंकाळी ५ ते ८ वा.

  • कुठे - ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी प्राधिकरण

  • वक्ते - अभिजित भांडारकर

  • विद्यार्थी व पालकांसाठी प्रवेश विनामूल्य

  • अधिक माहितीसाठी संपर्क : ९३०७७१५९०३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com