Cheque Clearing Issues
sakal
तळेगाव स्टेशन - नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी आरबीआयने पेमेंट सेटलमेंट नेटवर्क अद्ययावत केल्यानंतर बहुतांश बँकांनी आपलया यंत्रणेत सुसंगत सुधारणा न केल्याने सेम डे चेक क्लीयरिंगची प्रणाली घोषणेच्या पहिल्याच आठवड्यात कोलमडल्याचे चित्र आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार अडकल्याने बहुतांश बँक खातेदार, आस्थापना आणि व्यावसायीकांना दिवाळीच्या तोंडावर मनःस्थाप सहन करावा लागत आहे.