st bus lalpari and hirkani
sakal
- अविनाश ढगे
पिंपरी - आशियाई क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंसाठी उपयोगात आलेल्या, आरामदायी प्रवास घडवणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग (एसटी) महामंडळाच्या एशियाड (हिरकणी) बसची संख्या आता कमी होत आहे. तर, ताफ्यात नुकत्याच आलेल्या नव्या ‘लालपरी’ आणि जुन्या ‘हिरकणी’ बसमध्ये रंगसंगती वगळता फारसा फरक राहिलेला नाही. पण, सुविधा समान असताना एकाच मार्गावर भाडे वेगळे का? असा प्रश्न आता प्रवासी विचारत आहेत.