esakal | संदीप वाघेरे यांनी स्वखर्चातून ५० बेड, ४ व्हेंटिलेटर व २ हायफ्लो मशिन जिजामाता रुग्णालयाला दिले
sakal

बोलून बातमी शोधा

Sandip Waghere

संदीप वाघेरे यांनी स्वखर्चातून ५० बेड, ४ व्हेंटिलेटर व २ हायफ्लो मशिन जिजामाता रुग्णालयाला दिले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - महापालिकेच्या नवीन जिजामाता रुग्णालयात भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी स्वखर्चातून पन्नास फाउलर बेड, चार व्हेंटिलेटर व दोन हायफ्लो मशिन दिले. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासन अतोनात प्रयत्न करीत आहे. त्यात छोटासा हातभार लावावा, म्हणून ही अत्याधुनिक उपकरणे दिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

वाघेरे यांनी दिलेल्या उपकरणांच्या लोकार्पण सोहळ्यास खासदार श्रीरंग बारणे, आयुक्त राजेश पाटील, माजी आमदार विलास लांडे, गौतम चाबुकस्वार, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, प्रभाग सदस्य कुणाल लांडगे उपस्थित होते. समाजाच्या ऋणातून उतराई होण्यासाठी हा प्रयत्न करीत आहे. या उपकरणांतून काही रुग्णांना दिलासा मिळाला तरी माझे हे प्रयत्न सत्कारणी लागेल असे मी समजतो, अशी भावना वाघेरे यांनी व्यक्त केली. आयुक्त पाटील म्हणाले, ‘शहरांमधून वेगवेगळ्या निगेटिव्ह बातम्या कानावर पडत असताना नगरसेवक संदीप वाघेरे यांनी हा एक वेगळा उपक्रम हाती घेत महापालिकेला मोठे सहकार्य केले आहे. त्यांनी लोकार्पण केलेल्या उपकरणांचा लाभ निश्‍चितच शहरातील नागरिकांना होणार आहे.’ सूत्रसंचालन अनिल कातळे यांनी केले. संदीप वाघेरे युवा मंचचे अध्यक्ष हरीश वाघेरे, राजेंद्र वाघेरे, अमित कुदळे, शुभम शिंदे, श्रीकांत वाघेरे, आकाश चव्हाण, विठ्ठल जाधव, रंजना जाधव यांनी केले.

loading image