
जुनी सांगवी : जुनी सांगवी परिसरात मागील काही दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक रहिवासी प्रचंड हैराण झाले आहेत. विशेषतः दैनंदिन वापराच्या वेळेतच वीज गायब होत असल्याने घरगुती कामांपासून ते कार्यालयीन ऑनलाइन कामकाजावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे संतप्त सांगवीकरांनी गुरुवारी (ता.३१) महावितरणच्या कार्यालयात जाऊन आंदोलन केले.