आयटीपार्क' मधील शाळकरी बहिणींनी सीमेवरील जवानांसाठी पाठविल्या राख्या

सनफ्लॉवर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सेवानिवृत्त जवानांना व स्काऊट गाईडच्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात राख्या बांधून या शाळकरी बहिणींनी सैनिकांना अनोखी भेट
school students send rakhis to jawans on the border
school students send rakhis to jawans on the border sakal

वाकड : मारुंजी येथील लोकमित्र परिवार, सह्याद्री प्रतिष्ठान, सह्याद्री स्काऊट यांच्या संयुक्त विद्यमाने देशाच्या रक्षणार्थ सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी राख्या पाठविण्यात आल्या. सनफ्लॉवर पब्लिक स्कूलच्या प्रांगणात सेवानिवृत्त जवानांना व स्काऊट गाईडच्या प्रतिनिधींना प्रातिनिधिक स्वरूपात राख्या बांधून या शाळकरी बहिणींनी सैनिकांना अनोखी भेट दिली.

विद्यालयातील विद्यार्थिनी, महिला पालक यांनी बनविलेल्या शेकडो राख्या टपाल विभागामार्फत देशाच्या सैनिकांना पाठविण्यात आल्या. यावेळी लोकमित्र परिवाराचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव बुचडे, सह्याद्री प्रतिष्ठानचे पुणे जिल्हा अध्यक्ष दत्ता कुंजीर, माजी सैनिक रामदास मदने, चांगदेव कडलग, सह्याद्री स्काऊटचे युनीट लिडर विपन देशमुख, दत्ता चव्हाण, शहाजी बारणे, जीवन केदारी, प्राचार्या अश्विनी वठारे यांच्यासह पालक, शिक्षकवृंद उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com