
मोशी (पिंपरी-चिंचवड) : 'क' क्षेत्रीय कार्यालय मौजे चिखली (प्रभाग क्र 2) जाधववाडी, कुदळवाडी भागातील 18 मीटर देवराई डीपी रस्त्यालगतच्या अनधिकृत एक लाखाहून अधिक क्षेत्रफळावर केलेल्या पत्राशेड व बांधकाम आदी अतिक्रमणांवर बुधवारी (ता. 3) कारवाईचा हातोडा मारला. हीच कारवाई गुरुवारी (ता.4) सलग दुसऱ्या दिवशीही करण्यात आली. महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाने कारवाई केली. या कारवाईत कुदळवाडीमधील गट नंबर 256, 257, 258, 259 येथील एकूण 70 अनधिकृत पत्राशेड असे एकूण क्षेत्रफळ अंदाजे एक लाख 46 हजार चौरस फूट पाडण्यात आली आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
आज बुलडोझरमुळे अधिकचे नुकसान होऊ नये म्हणून उरलेल्या पत्राशेड मालकांनी स्वतःहून काढून घेतल्या. येथील अतिक्रमण काढल्याने मोठ्या प्रमाणावरील भूखंड मोकळा दिसू लागला आहे. ही कारवाई अतिरिक्त आयुक्त दोनचे अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपायुक्त मनोज लोणकर, सह शहर अभियंता मकरंद निकम. कार्यकारी अभियंता राजेंद्र राणे, उपअभियंता सूर्यकांत मोहिते, हेमंत देसाई, सुधीर मोरे, पोलिस उपअधीक्षक सुधीर हिरेमठ आदींच्या उपस्थितीत करण्यात आली. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वीज व पाणी आले कुठून?
ही सर्व सत्तरहून अधिक पत्राशेड पाडल्यानंतर या ठिकाणी आढळलेले वीज
वाहक वायरींचे जाळे, वीज व पाणी पाहता ही पत्राशेड अनधिकृत असूनही त्यांना वीज व पाणी पुरवठा कसा होत होता, असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.
शहरात यापुढेही ठिकठिकाणी झालेल्या व्यापारी अनधिकृत पत्राशेडवर कारवाई करण्यात येणार असून, या पत्राशेडधारकांना पत्राशेड काढून घेण्याचे व होणारे नुकसान टाळण्याचे आवाहन केले आहे.
- अजित पवार, अतिरिक्त आयुक्त