esakal | पिंपरी-चिंचवड : महापालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू
sakal

बोलून बातमी शोधा

पिंपरी-चिंचवड : महापालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू
  • विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेने उमेदवार न दिल्याने भाजपचे आठही उमेदवार बिनविरोध निवडून येणार

पिंपरी-चिंचवड : महापालिका क्षेत्रीय कार्यालयाच्या अध्यक्षपदाची निवड प्रक्रिया सुरू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या आठ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया आज शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजता सुरू झाली. सोमवारपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेही उमेदवार न दिल्याने सत्ताधारी भाजपचे आठही उमेदवार बिनविरोध निवडून येणार आहेत. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी शर्मिला बाबर, ब क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी सुरेश भोईर, क क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी राजेंद्र लांडगे, ड क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी सागर आंघोळकर, इ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी विकास डोळस, फ क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी कुंदन गायकवाड, ग क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी बाबा त्रिभुवन आणि ह क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी हर्शल ढोरे यांनी सत्ताधारी भाजपकडून अर्ज दाखल केला आहे. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

चार वर्षांत दोनदा संधी 

महापालिका निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. तेव्हापासून आतापर्यंत गेल्या चार वर्षांत भाजपच्या दोन सदस्यांना दोन वेळा क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदाची संधी मिळाली. यामध्ये नगरसेविका शर्मिला बाबर आणि नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांचा समावेश आहे. बाबर या 'अ' क्षेत्रीय कार्यालयाच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. त्यांनी पुन्हा अर्ज दाखल केला होता. अन्य कोणी अर्ज न केल्याने बाबर यांना पुन्हा संधी मिळाली. तसेच, ग क्षेत्रीय कार्यालय अध्यक्षपदी आज बिनविरोध निवड झालेले बाबासाहेब त्रिभुवन 2018 मध्येही 'ग' क्षेत्रीय कार्यालयाचे अध्यक्ष होते. या वेळी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

क्षेत्रीय कार्यालय निहाय निवडणूक प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह कार्यालय अशा क्रमाने निवडणूक प्रक्रिया होईल. दुपारी चार वाजेपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण होईल, असे महापालिकेच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले.