esakal | विनापरवाना दारू विक्री; चिखलीतील हॉटेलवर पोलिसांकडून छापा
sakal

बोलून बातमी शोधा

विनापरवाना दारू विक्री; चिखलीतील हॉटेलवर पोलिसांकडून छापा

विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला.

विनापरवाना दारू विक्री; चिखलीतील हॉटेलवर पोलिसांकडून छापा

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पिंपरी : विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या हॉटेलवर पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. ही कारवाई चिखली येथे करण्यात आली. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अजय अश्‍विनी कबीराज (वय 36), चिन्मय पूर्णा तरफदार (वय 34, दोघेही रा. हॉटेल सरपंच मळा, शेलारवस्ती, चिखली, मूळ-कोलकाता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दोघे आरोपी हे हॉटेलचे मॅनेजर आहेत. चिखलीतील देहू-आळंदी रोवडरील शेलार वस्ती येथील सरपंच मळा या हॉटेलमध्ये विनापरवाना देशी, विदेशी दारू व बिअरची विक्री होत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार हॉटेलवर छापा टाकला असता आरोपी हे हॉटेलमध्ये ग्राहकांना एकत्र बसवून त्यांना दारुची विक्री करताना आढळून आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकांना एकत्र जमवून मानवी सुरक्षितता धोक्‍यात येईल, असे कृत्य करून कोरोना आजार पसरविण्याचे कृत्य केल्याने आरोपींवर गुन्हा दाखल झाला. चिखली पोलिस अधिक तपास करीत आहेत.