पिंपरी-चिंचवडमध्ये गांजा तस्करीचं सत्र कायम; गांजा बाळगणाऱ्या दोघांना चिखलीत अटक 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 18 October 2020

  • गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने चिखली येथे सात लाख रुपये किमतीचा गांजा पकडला.

पिंपरी : गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने चिखली येथे सात लाख रुपये किमतीचा गांजा पकडला. गांजा बाळगणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राहुल भिमराव पवार (वय 21, रा. सिद्धार्थनगर झोपडपट्टी, यमुनानगर, ओटास्किम, निगडी) व अमोल अशोक शिंदे (वय 26, रा. प्रेरणा हौसिंग सोसायटी, अंकुश चौक, निगडी) अशी आरोपींची नावे आहेत. शनिवारी (ता. 17) दुपारी दीडच्या सुमारास सेक्‍टर क्रमांक 19 येथे सेवा रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली उभ्या असलेल्या दोघांकडे अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी पवार व शिंदे यांना ताब्यात घेतले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

त्यांच्याकडील पोत्यात सात लाख रुपये किमतीचा 27 किलो 500 वजनाचा गांजा सापडला. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली 90 हजार रुपये किमतीची दुचाकी व गांजा, असा एकूण सात लाख 90 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: seven lakh cannabis seized in chikhali pimpri chinchwad

Tags
टॉपिकस