पिंपरी-चिंचवडकरांसाठी चिंताजनक; दर दोन तासांत सापडताहेत पॉझिटिव्ह रुग्ण

पिंपरी-चिंचवडकरांसाठी चिंताजनक; दर दोन तासांत सापडताहेत पॉझिटिव्ह रुग्ण

पिंपरी : पिंपरी-चिंचवडसाठी चिंताजनक बातमी आहे. शुक्रवारी (ता. 15) रात्री दहापासून शनिवारी (ता. 16) दुपारी बारापर्यंत म्हणजे गेल्या चौदा तासांत सात जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. अर्थात दर दोन तासांत एक व्यक्ती पॉझिटिव्ह मिळाली आहे. मात्र, अवघी एक व्यक्ती बरी होऊन घरी पोचली आहे. 

शहरातील कोरोना बधितांची संख्या दररोज वाढतच आहे.  शुक्रवारी दुपारी बारापर्यंत नवीन सात रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत 187 असलेली एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 194 झाली आहे. यात 118 पुरुष आणि 76 महिला आहेत. आज पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्ती फुगेवाडी, पिंपळे सौदागर परिसरातील आहेत. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महापालिका रुग्णालयात शुक्रवारपर्यंत एकूण 221 रुग्णांची नोंद झाली आहे. यात शहरातील 194 आणि पुण्यातील 27 रुग्णांचा समावेश आहे. आजपर्यंत 12 जणांचा मृत्यू झालेला आहे. त्यात पुण्यातील आठ जण आहेत. आजपर्यंत 117 जण करोना मुक्त झाले आहेत. आज कोरोना मुक्त झालेली व्यक्ती पिंपळे सौदागर परिसरातील रहिवासी आहे. सध्या 73 संशयित रुग्णालयांत दाखल असून, त्यांचे तपासणी अहवाल प्रतिक्षेत आहेत. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्यातील रुग्णालयात उपचार घेत असलेले पिंपरी चिंचवड शहरातील रूग्णांची संख्या आठ आहे. तर, पुण्यातील 9 जण पिंपरी चिंचवड शहरात उपचार घेत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com