
पिंपरी : बनावट शिक्षक भरतीप्रकरणी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ठोस कार्यवाहीस सुरुवात केली आहे. या प्रकरणातील आकुर्डी-श्रीकृष्णनगरमधील श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिरच्या सात शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. याबाबत त्यांनी प्रशासन अधिकारी ज्योस्त्ना शिंदे यांना लेखी कळविले आहे.
शिक्षक भरतीसाठी बनावट मान्यता आणि बनावट शिक्षक भरतीचा गैरव्यवहार ‘सकाळ’ने उजेडात आणला. सध्या हे भरतीप्रकरण गाजत असल्यामुळे सरकारच्या आदेशानुसार शिक्षण उपसंचालक कार्यालयाने भरती प्रकरणांची सुनावणी केली. अनेक शाळांना अनियमित आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे मान्यता दिल्याचे आढळून आले.
- पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मुख्य सूत्रधार शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष शिरसाट यांनी नवनगर शिक्षण मंडळाच्या श्री सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील सात शिक्षकांची बनावट कागदपत्र सादर करून बोगस मान्यता घेतली होती. त्या काही शिक्षकांच्या विनाअनुदानित तत्त्वावरून अनुदानित तत्त्वावर केल्यास मान्यता घेतली आहे. बदली शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्राथमिक शिक्षण संचालक, प्राथमिक शिक्षण संचालनालय पुणे यांना कळविले आहे.
नियमबाह्य पद्धतीने मान्यता
तत्कालीन प्रशासन अधिकारी आशा उबाळे यांनी नियमबाह्य पद्धतीने मान्यता दिल्या. त्याआधारे शिक्षण संस्थांनी या शिक्षकांना सेवेत घेतले. या शिक्षकांना शालार्थ वेतन प्रणालीत समाविष्ट करून त्यांना वेतनही सुरू केल्याचे प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे यांनी सांगितले. त्यात सीमा खेडेकर, अविनाश आखाडे, सचिन बिब्बे, सागर फलके, सुनीता सोनवणे, मनीषा चिंचवडे, हर्षा जंगले या शिक्षकांचा समावेश आहे. या शिक्षकांचे वेतन अदा करू नये, असे प्राथमिक शिक्षण संचालनालयाने शिक्षण विभागाला कळविले आहे.
नियमबाह्य मान्यताप्रकरणी शिक्षण आयुक्तालयाने अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली आहे. शिक्षण आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार सरस्वती शाळेतील सात शिक्षकांचे वेतन थांबविले आहे. त्याबाबतीत आदेश दिले आहेत. त्या शिक्षकांचे वेतन अदा झाल्यास सर्वस्वी जबाबदारी अधिकारी व मुख्याध्यापकांची राहणार आहे.
- औदुंबर उकिरडे, शिक्षण उपसंचालक
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(संपादन : शिवनंदन बाविस्कर)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.