खेळता खेळता रस्त्याच्या बाजूकडील खड्ड्यात चिमुकला पडला अन्...

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय मुलाचा रस्त्याच्या बाजूकडील खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना चांदखेड गावात घडली. वरद दिगंबर लांडे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

बेबडओहोळ : बाहेर खेळण्यासाठी गेलेल्या सात वर्षीय मुलाचा रस्त्याच्या बाजूकडील खड्ड्यात पडून पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना चांदखेड गावात घडली. वरद दिगंबर लांडे असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

यासंदर्भात पोलिस पाटील दत्तात्रय माळी यांनी फिर्याद दिली असून लांडे कुटुंब मुळचे कोल्हापूर येथील असून ते कामासाठी चांदखेड गावात आले होते. त्यांचे कपड्याचे छोटेसे दुकान आहे. दुपारी दोन वाजता वरद हा खेळता खेळता जवळ असलेल्या रस्त्यावर आला. सध्या चांदखेड बेबडओहोळ, ऊर्से या प्रमुख राज्य मार्ग क्रमांक १०५ रस्त्याचे काम सुरू असुन जागोजागी मो-या टाकण्यासाठी खड्डे खोदुन ठेवले आहे. याच मो-यांजवळील खड्ड्यात पाणी साचले होते. त्याच खड्ड्यात वरद हा खेळताना पाण्यात पडून मृत्यूमुखी पडला. वरद हा एकुलता एक मुलगा असल्याने लांडे कुटूंबाबर मोठी शोककळा पसरली. 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदर सुरू असलेल्या प्रमुख राज्य मार्ग १०५ रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग दक्षिण यांच्याकडे असून जागोजागी खोदुन ठेवलेल्या खड्ड्याकडे लक्ष नसल्याचे सांगण्यात येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Seven-year-old boy dies after falling into pit