
तळेगाव दाभाडे : घरात आई-वडिलांचे भांडण सुरू असताना घाबरून सात वर्षांच्या मुलीने घर सोडले. मुलगी भटकत सुमारे चार ते पाच किलोमीटर लांब आली. चौकात असलेल्या वाहतूक पोलिस महिलेला लहान मुलगी रडत असल्याचे दिसले. त्यानंतर, पोलिस महिलेने सतर्कता दाखवत मुलीच्या पालकांचा शोध घेऊन मुलीला पालकांच्या ताब्यात दिले.