
हिंजवडी : ‘महाराष्ट्र तसेच देशाच्या आयटी क्षेत्रात राजीव गांधी आयटी पार्क हे एक चमकणारे नाव आहे. हिंजवडी, खराडी, मगरपट्टा सिटी येथील आयटी पार्क्समुळे पुणे जागतिक आयटी हब बनले. यामागील दूरदृष्टी आणि नेतृत्वाचे श्रेय ज्येष्ठ नेते शरद पवार यांना जाते,’ असे गौरवोद्गार हिंजवडीच्या ग्रामस्थांनी एका भावनिक पत्राद्वारे काढले आहेत.