
बारामती : नर्मविनोदी आणि कुटुंबाने एकत्रित आनंद घ्यावा असे प्रशांत दामले यांची मुख्य भूमिका असलेले ‘शिकायला गेलो एक’ हे नाटक गुरुवारी (ता. ५) बारामतीत सादर होत आहे. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने मुख्य प्रायोजक समर्थ आयकॉनचा उपक्रम सेव्हन स्टार आयकॉन, सहयोगी प्रायोजक रजवाडी मसाले व चंदुकाका सराफ यांच्या सहकार्याने या नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे.