Shirgav Crime : सरपंच खून प्रकरणातील मारेकरी अटकेत

मावळ तालुक्यातील शिरगावचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७) यांच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना शिरगाव पोलिसांनी अटक केली.
Pravin Gopale
Pravin Gopalesakal
Updated on
Summary

मावळ तालुक्यातील शिरगावचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७) यांच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना शिरगाव पोलिसांनी अटक केली.

पिंपरी - मावळ तालुक्यातील शिरगावचे सरपंच प्रवीण साहेबराव गोपाळे (वय ४७) यांच्या खून प्रकरणातील मारेकऱ्यांना शिरगाव पोलिसांनी अटक केली. या आरोपींना १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

विशाल उर्फ किरण सुनील गायकवाड (वय २५), संदीप उर्फ अण्णा छगन गोपाळे (वय ३१), ऋतिक शिवाजी गोपाळे (वय २२, सर्व रा. शिरगाव, ता. मावळ) अशी आरोपींची नावे आहेत. तर या घटनेचा कट रचणारे महेश भेगडे (रा. तळेगाव), मनीष ओव्हाळ (रा. जांभूळ), अशोक कांबळे (रा.कांब्रे), अमोल गोपाळे (रा.शिरगाव) यांना यापूर्वीच अटक केलेली आहे. याप्रकरणी प्रवीण यांचे भाऊ रवींद्र गोपाळे यांनी शिरगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शनिवारी (ता. १) रात्री सव्वा नऊच्या सुमारास प्रवीण गोपाळे हे साई मंदिरासमोर मित्रासोबत गप्पा मारत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्यावर वार केले. यात त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळावरील फुटेजच्या आधारे तपास करीत गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने सुरुवातीला चौघांना अटक केली होती. या आरोपींना ६ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, मारेकऱ्यांचा शोध सुरु होता. अखेर विशाल, संदीप व ऋतिक हे मारेकरीही हाती लागले आहेत. त्यांना न्यायालयात हजर केले असता १० एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. हा हल्ला कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास सुरु आहे. गोपाळे यांचा जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय होता. दरम्यान, हा हल्ला जमिनीच्या वादातून झाला असल्याचा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com