पिंपरी - शिवचरित्राची तेजस्वी गाथा रंजकपणे सादर करणाऱ्या ‘गोष्ट इथे संपत नाही’ या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे चार प्रयोग सकाळ माध्यम समूहातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आयोजित केले आहेत.
‘गोष्ट इथे संपत नाही - शिवचरित्र’ या उपक्रमांतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाच्या अध्यायांवरील हे कार्यक्रम १७ ते २० मे या कालावधीत सायंकाळी पाच वाजता सुरू होतील.