पिंपरी - महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील आरेखक आणि सांगवीतील रहिवासी संजीवनी प्रदीप मोरे यांचा मुलगा शिवराज यांची वयाच्या २२ व्या वर्षी सैन्यदलात लेफ्टनंट पदावर नेमणूक झाली. सैन्यदलात रुजू होण्यापूर्वी शिवराज यांनी आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.