तळेगाव दाभाडे : पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर ओझर्डे गावाजवळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) शिवशाही बसला आग लागली. ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली..पुणे येथून मुंबईच्या दिशेने ही बस जात होती. उर्से टोलनाक्याच्या पुढे गेल्यानंतर ओझर्डे गावाच्या हद्दीत बसला अचानक आग लागली. त्यावेळी बसमध्ये १२ प्रवासी प्रवास करत होते. बसला आग लागल्याचे सुरुवातीलाच चालकाच्या निदर्शनास आले. त्याने प्रसंगावधान राखत बस तत्काळ रस्त्याच्या बाजूला उभी केली. त्यानंतर बस मधील बारा प्रवाशांना सुखरूप खाली उतरविण्यात आले..काही वेळेतच संपूर्ण बसने पेट घेतला. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव वाचला. या दुर्घटनेमुळे द्रुतगती मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच आयआरबी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी पाणी मारून बसला लागलेली आग नियंत्रणात आणली..Pune Crime News : मनोरुग्ण महिलेसाठी ठेवला केअर टेकर, तरुणाने गैरफायदा घेत केले अत्याचार.त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वीच बोरघाटात एक खासगी बस जळून खाक झाली होती. त्या पाठोपाठ बसला आग लागण्याची ही घटना घडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.