
पिंपरी : केवळ सिगारेट व माचिस दिली नाही म्हणून तीन अल्पवयीन मुलांनी एकावर कोयत्याने वार करून त्या व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना चार दिवसांपूर्वी चिखली येथे घडली. यासारख्या इतरही गंभीर गुन्ह्यांतील आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश असल्याचे समोर येते. खून, खुनाचा प्रयत्न, हाणामारी, वाहनांची तोडफोड अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा वाढत असलेला सहभाग चिंतेची बाब ठरत आहे.