esakal | पिंपरी : तरुणावर वार करीत दुकानाची तोडफोड
sakal

बोलून बातमी शोधा

Attack

पिंपरी : तरुणावर वार करीत दुकानाची तोडफोड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - पिंपरीतील डिलक्स चौकातील कपड्याच्या दुकानात तोंडाला रुमाल बांधून तिघेजण शिरले. 'आम्हाला पैसे द्या नाहीतर येथे धंदा करू देणार नाही' असे म्हणत तिघांनी मिळून दुकानातील कामगारांवर चॉपरने वार केले. त्यानंतर दुकानाची तोडफोड करीत दहशत माजवली. जिवाच्या भीतीने दुकानातील कामगार बाहेर पळाले.

याप्रकरणी कासीम अस्लम शेख (रा. बौद्धनगर, पिंपरी ) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार किरण (वय २२), तुषार (वय २०), सुमित (वय २४, सर्व रा,. बौध्दनगर, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी सोमवारी (ता. १३) सायंकाळी सहाच्या सुमारास डिलक्स चौकातील मिस्टर मॅड या कपड्याच्या दुकानात काम करीत असताना आरोपी दुकानात आले. 'आम्हाला पैसे द्या नाहीतर येथे धंदा करू देणार नाही' असे म्हणत लोखण्डी चॉपरने फिर्यादीवर वार केले. तसेच इतर कामगारानंही जखमी करून दुकानाची समोरील काच, काउंटरवरील काच फोडून पुतळ्याचे नुकसान केले. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. पिंपरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

loading image
go to top