पिंपरी : दुकानदाराला जिवे मारण्याची धमकी देत टोळक्‍याने कोयते भिरकावत माजविली दहशत

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 13 February 2021

टोळक्‍याने दुकानांमध्ये शिरून कोयत्याचा धाक दाखवित हप्ता मागितला. पैसे देण्यास नकार दिला असता जिवे मारण्याची धमकी देत टोळक्‍याने कोयते हवेत भिरकावून परिसरात दहशत माजविली.

पिंपरी - टोळक्‍याने दुकानांमध्ये शिरून कोयत्याचा धाक दाखवित हप्ता मागितला. पैसे देण्यास नकार दिला असता जिवे मारण्याची धमकी देत टोळक्‍याने कोयते हवेत भिरकावून परिसरात दहशत माजविली. गल्ल्यातील रोकड लुटली. याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. हा प्रकार काळेवाडी येथे घडला.

आता राहुल गांधींनी लग्न करावे; 'हम दो हमारे दो' स्लोगनवर आठवलेंचा मास्टर स्ट्रोक

सूरज परदेशी (वय 27), नितीन भोसले (वय 25), राम आवळे (वय 27), नितीन रसाळ (वय 27, सर्व रा. काळेवाडी), राजू (वय 28, रा. थेरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. पहिल्या घटनेप्रकरणी बद्रे आलम मेहबूब मनिहार (रा. गणराज कॉलनी, आदर्शनगर, काळेवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास फिर्यादी हे त्यांच्या बेकरीत असताना आरोपी हातात कोयता व चाकू घेऊन बेकरीत शिरले. फिर्यादीला धमकावून पैसे मागितले असता त्यांनी नकार दिल्याने फिर्यादीला शिवीगाळ केली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी देत हत्यारे हवेत भिरकावून परिसरात दहशत माजवली. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

तर दुसऱ्या घटनेप्रकरणी शीतल धनराज गवळी (रा. घरकुल, चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. गुरूवारी (ता.11) रात्री पावणे आठच्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती हे आदर्शनगर येथील किराणा दुकानात होते. त्यावेळी राम आवळे याच्यासह आणखी एकजण दुकानात शिरला. जबरदस्तीने फ्रीजमधील थंडपेयाच्या बाटल्या काढून त्यांच्यासोबत असणाऱ्या इतरांना देऊ लागला असता फिर्यादी यांनी त्याला विरोध केला. दरम्यान, आरोपींनी फिर्यादीसह त्यांच्या पतीला कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादीकडे दोन हजारांचा हप्ता मागितला. त्यानंतर फिर्यादीच्या पतीला मारण्यासाठी कोयता घेऊन आरोपी त्यांच्या मागे धावले. तसेच दुकानातील गल्ल्यातील साडे पाच हजारांची रोकड व आठ हजारांचा मोबाईल घेऊन गेले. या दोन्ही घटनेप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shopkeeper Gang Panic warning crime police

Tags
टॉपिकस
Topic Tags: