VIDEO : पिंपरी कॅम्पातील दुकानांबाबतचा 'हा' आदेश कायम राहणार 

VIDEO : पिंपरी कॅम्पातील दुकानांबाबतचा 'हा' आदेश कायम राहणार 

पिंपरी : पिंपरी कॅम्प परिसरातील दुकाने सम-विषम पद्धतीनेच सुरू ठेवण्याचा गेल्या आठवड्यात झालेला निर्णय महापालिकेकडून पुढील आदेश येईपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय पिंपरीतील व्यापाऱ्यांनी घेतला. 

गेल्या आठवड्यात व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्याचा निर्णय व्यापाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन व्हावे, खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना त्यांच्या वाहने लावण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी, असे प्रमुख उद्देश त्यामागे होते. व्यापाऱ्यांनी सुरवातीला 31 मे पर्यंतच्या कालावधीसाठी हा निर्णय घेतला होता. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी रात्री पुन्हा पुढील आठवड्याची यासंदर्भातील दिशा ठरविण्यासाठी बैठक झाली. या बैठकीला परिसरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू ठेवण्याचा चांगला उपयोग होत असल्याचे चर्चेअंती निष्पन्न झाले. त्यामुळे आणखी काही दिवस समविषम पद्धतीनेच दुकाने सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. कॅम्पात फेरफटका मारला असता सम-विषमच्या नियमाची बहुतेक ठिकाणी अंमलबजावणी सुरू असल्याचे दिसून आले. तसेच दुकानदारांनी खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांसाठी दुकानात सॅनिटायझर, हॅण्डवॉशची सुविधा केलेली होती. ग्राहक सोशल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन करताना दिसत होते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

किराणा दुकानांमध्ये ग्राहकांची जास्त गर्दी होत असे. त्याबद्दल महापालिका प्रशासनाकडे बऱ्याच तक्रारी गेल्या. त्यामुळे महापालिकेने कॅम्प काही दिवस बंद केला होता. त्यामुळे व्यापाऱ्यांनी 30 ते 35 स्वयंसेवक नेमले आहेत. त्यांच्यामार्फत समविषमच्या नियमाची अंमलबजावणी होते, की नाही याची सतत पाहणी करण्यात येते. कोणी दुकान सुरू ठेवण्याचा प्रयत्न केल्यास त्याची माहिती तातडीने महापालिका प्रशासनाला कळविण्यात येते. दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेतच सुरू राहणार आहेत. 

- महेश मोटवानी, अध्यक्ष, पिंपरी व्यापारी असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com