चिखली - शिक्षणासाठी इडल्या, सामोसे विकले. उपाशीपोटी राहून अतिशय हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले. अखेर त्या कष्टाचे फळ मिळाले. दुबईत एका आंतरराष्ट्रीय कंपनीत नोकरी मिळाली. मात्र स्वतःचे हलाखीचे दिवस तो विसरला नाही..आपल्याप्रमाणे लोक उपाशीपोटी झोपू नयेत. त्यांचे जीवन सुकर होण्यास मदत व्हावी या भावनेतून गेल्या पाच वर्षांपासून आपल्या आई-वडिलांमार्फत एका अनाथ आश्रमासह किमान दीडशे ते दोनशे गरिबांना तो दर महिन्याला नियमित अन्नधान्य आणि कपडे देत आहे..गरिबांना हात देणाऱ्या या होतकरु तरुणाचे नाव आहे शुभम जयस्वाल. चिखली येथे जन्मलेल्या शुभमची आई त्याच्या लहानपणीच वारली. पुण्यातील एका ख्रिश्चन मिशनरी शाळेत त्याला दत्तक घेतल्यावर त्याचे दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. दहावीनंतर तो घरी आला. आई-वडीलांची परिस्थिती हालाखीची होती. सावत्र आईने चपात्या विकून त्याचा संभाळ व शिक्षण केले..परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणाची आवड असल्याने त्याने इडल्या, सामोसे विकून आपला महाविद्यालयीन खर्च भागवला. पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयामधून तो एमबीए झाला. त्यानंतर २०१८ मध्ये त्याला दुबई येथे एका आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यानंतरही गरिबीत काढलेले दिवस तो विसरला नाही..आपल्याप्रमाणे अनेकांना असंख्य अडचणीचा सामना करावा लागतो. अनेकांना उपाशीपोटी झोपावे लागते, ही भावना त्याने आपले वडील सुरेश जयस्वाल यांना बोलून दाखवली. त्यानंतर २०१९ मध्ये कोरोना महामारीमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. त्यातून त्याने गोरगरीब लोकांना धान्य आणि कपडे वाटप करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात हजार लोकांना अन्नधान्य आणि कपड्याचे त्याने वाटप केले. ते आजतागायत सुरूच आहे..आपल्या वागण्यात विनम्रता असेल; तर समाजातील अनेक जण आपल्याला मदत करतात. तसे माझ्या बाबतीतही घडले. आहे. सावत्र आई असूनही तिने अंगावरचे सर्व दागिने विकून मला शिकवले. गरिबी खूप जवळून पाहिली. मात्र, गरिबीतून बाहेर पडता येते. फक्त गरिबीमधून बाहेर पडण्याची इच्छा असणाऱ्या व्यक्तींना वेळेवर थोडीशी मदत आणि दिशा दाखवण्याची गरज असते.- शुभम जयस्वाल, उच्चशिक्षित तरुण.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.