Video : चिंचवडमधला चर्चेत असणारा वाढदिवस; पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना अनोखे 'थँक्यू'

Video : चिंचवडमधला चर्चेत असणारा वाढदिवस; पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना अनोखे 'थँक्यू'

पिंपरी : निगडी येथील पीएमपीच्या बसस्थानकावर आज (मंगळवार, ता. 26) एक अनोखा वाढदिवस साजरा झाला. हा वाढदिवस तुमच्या-आमच्या दररोजच्या वाढदिवसासारखा नक्कीच नव्हता. कारण, त्यात आपुलकी आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा एक विचार अन् कृतीशीलतेचा परिपाठ होता. 

चिंचवड-कृष्णा नगरमधील शुभम मेदनकर या विद्यार्थ्यांने पीएमपीच्या कर्मचार्‍यांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करून कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत वाढदिवस साजरा केला. शुभम हा पुण्यातील वाडीया कॉलेजमध्ये मेकॅनिक अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. तो दहावीत असल्यापासून पीएमपीने प्रवास करतोय. म्हणूनच त्याच नातं पीएमपीशी दीर्घकाळासाठी जुळून आलेलं. इतक्या वर्षात पहिल्यांदाच  लॉकडाउनमुळे दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी बस सेवा बंद राहिली. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

दररोजचा संपर्क तुटला. नेमकी त्याच्या वाढदिवशीच पीएमपीची बससेवा सुरू झाली. या योगायोगामुळे त्याने ठरवलं, की एवढे वर्ष हे वाहनचालक आणि वाहक नित्यसेवा देतात. लोकांच्या संपर्कात असतात. दररोज बर्‍याच प्रवाशांना सामोरे जावे लागते. त्यांनी सुरक्षित असणे आवश्यक आहे. म्हणूनच  शुभमने अशा अभिनव पद्धतीने वाढदिवस साजरा करून दुसऱ्यांपुढे आदर्श वस्तूपाठ ठेवला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com