पिंपरीत आनंदनगर बनतंय कोरोना हॉटस्पॉट; आणखी सहा रुग्ण आढळले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

गेल्या चार दिवसांत येथील रुग्ण संख्या 36 झाली आहे.

पिंपरी Coronavirus : चिंचवड स्टेशन आनंदनगर परिसरात गुरुवारी (ता. 21) आणखी सहा रुग्ण आढळले. गेल्या चार दिवसांत येथील रुग्ण संख्या 36 झाली आहे. दरम्यान, शहरातील एकूण रुग्ण संख्या 254 झाली. त्यात तरुणांची संख्या सर्वाधिक 110 आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेच्या वायसीएम आणि भोसरी रुग्णालयात दाखल 14 जणांचे अहवाल आज पॉझिटिव्ह आले. त्यातील सहा जण आनंदनगरमधील आहेत. अन्य रुग्ण दिघी, पिंपळे सौदगर, पिंपरी, वाल्हेकरवाडी व मुंबई येथील आहेत. तर 11 जणांना घरी सोडण्यात आले असून ते मोशी, जुनी सांगवी, चिखली परिसरातील रहिवासी आहेत.

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज आढळलेल्या 14 जणांमध्ये सहा पुरुष व आठ महिला आहेत. त्यात 12 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. तसेच, मुंबईहून शहरात आलेल्या एका व्यक्तीलाही संसर्ग झाला आहे. आज गणेशम् सोसायटी पिंपळे सौदागर आणि बालघरे वस्ती चिखली हे भाग सील करण्यात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Six corona positives were found in Anandnagar