Organ Donate : पिंपरीत ३६ तासांमध्ये सहा अवयव प्रत्यारोपण यशस्वी; अनेक रुग्णांना जीवदान

एका ५२ वर्षीय महिलेचा अपघात झाल्याने तिला खेड येथून रुग्णवाहिकेद्वारे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय येथे आणण्यात आले.
Organ Donate
Organ Donatesakal
Updated on

पिंपरी - नातेवाइकांचे दातृत्व, वैद्यकीय विज्ञानातील प्रगती, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि डॉक्टरांचे योगदान यामुळे केवळ ३६ तासांमध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी करण्याची किमया पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील डॉक्टरांनी साधली आहे. केवळ ३६ तासांमध्ये म्हणजेच दीड दिवसांत तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने २ फुफ्फुस, ३ किडनी व १ यकृत प्रत्यारोपण करून अनेक रुग्णांना जीवदान दिले आहे.

नातेवाइकांचे दातृत्व

एका ५२ वर्षीय महिलेचा अपघात झाल्याने तिला खेड येथून रुग्णवाहिकेद्वारे डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय येथे आणण्यात आले. डॉक्टरांनी उपचारांद्वारे अथक प्रयत्न केले. मात्र, तिचा मेंदू मृत घोषित करण्यात आला. या महिलेच्या कुटुंबीयांनी फुफ्फुस, किडनी आणि यकृत दान करण्याचा निर्णय घेतला.

याचवेळी दुसऱ्या रुग्णालयातील दात्याकडून प्रत्यारोपणासाठी फुफ्फुस आणि किडनी उपलब्ध झाले. त्यामुळे या पाच अवयवांचे यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले. तसेच सहावे प्रत्यारोपण एका जिवंत दात्याच्या अवयवाद्वारे करण्यात आले.

३६ तासांत ६ अवयव प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी रुग्णालयातील शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ आणि गहनचिकित्सा तज्ज्ञ यांनी मोलाची कामगिरी बजावली. त्यासोबतच येथील तंत्रज्ञ, प्रत्यारोपण समन्वय, परिचारिका आणि प्रशासन विभाग यांनीही चोख नियोजन केले.

आमच्या वैद्यकीय संघाच्या कौशल्य आणि समर्पणामुळे ३६ तासांत ६ अवयव प्रत्यारोपण यशस्वीरीत्या पूर्ण करणे शक्य झाले. अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशील राहू. आम्ही दात्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उदारतेबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. हे मानवतेचे जिवंत उदाहरण आहे.

- डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी

अवयव प्रत्यारोपण टीमची ही एक विलक्षण कामगिरी आहे. हे प्रत्यारोपण यशस्वी होण्यासाठी नेमकेपणाने आणि कार्यक्षमतेने एकाच वेळी सहा ऑपरेटिंग थिएटर्स चालविण्यासाठी समन्वयक, परिचारिका, शल्यचिकित्सक, भूलतज्ज्ञ, चिकित्सक आणि रक्तपेढीच्या टीमकडून अविरत प्रयत्न करण्यात आले. या सर्वांच्या सहकार्यानेच ते शक्य झाले.

- डॉ. वृषाली पाटील, कार्यक्रम संचालक आणि प्रमुख, अवयव प्रत्यारोपण विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com