
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (ता. 12) जाहीर झाला. या परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन केले. पाचवीचे सोळा तर आठवीचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून, पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले आहेत.
पिंपरी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेतलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल गुरुवारी (ता. 12) जाहीर झाला. या परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी अतुलनीय यश संपादन केले. पाचवीचे सोळा तर आठवीचे पाच विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले असून, पिंपळे गुरव प्राथमिक शाळेतील सहा विद्यार्थी चमकले आहेत.
पिंपरी चिचंवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
राज्य परीक्षा परिषदेकडून 16 फेब्रुवारीला परीक्षा घेण्यात आली होती. यंदा शहरातील 12 हजार 724 विद्यार्थ्याची शिष्यवृत्ती दिली. पाचवीच्या सात हजार 946 विद्यार्थ्यांनी, आठवीच्या चार हजार 778 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. या परीक्षेचा अंतरिम निकाल नऊ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आला होता. त्यात महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी यंदा चांगले यश मिळवीत पाचवीतील विद्यार्थ्यांनी अंजली त्रिमुखे, अनुसया स्वामी, वैष्णवी सगर, राम कुलकर्णी, स्नेहा मालकट्टे, कलावती जमादार (पिंपळे गुरव प्राथमिक शाळा), प्राजक्ता डोंगरे (मोशी कन्या प्राथमिक शाळा), आकाश लवकुश कश्यप (मोशी मुले प्राथमिक शाळा), रोहन जगताप (वाकड मुले प्राथमिक शाळा), महम्मद मसूद रजा अब्दुल माजीद खान, हुजेफा अहमद (मरहुम फकीरभाई पानसरे उर्दू प्राथमिक शाळा), सुदीप सूर्यवंशी (शेवंताबाई जगताप प्राथमिक शाळा वैदुवस्ती), सुहानी मोहिते (कुदळवाडी प्राथमिक शाळा), सिद्धार्थ गायकवाड(बोराडेवाडी प्राथमिक शाळा), मिजबा पटेल, उत्कर्ष कांबळे (मुले-मुली2/2 निगडी) तर आठवीचे विद्यार्थ्यांमध्ये गौरी वाघमारे (थेरगाव माध्यमिक विद्यालय), श्याम हांगे व ज्ञानसागर मिसाळ (जाधववाडी मुले प्राथमिक शाळा), अनिल केवट (छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भोसरी), प्रतिज्ञा हुलावळे (मोशी कन्या प्राथमिक शाळा) आदींचे गुणवत्ता यादीत नाव झळकले आहे.
संपादन - सुस्मिता वडतिले